मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  गुणरत्न सदावर्तेंकडून नथुराम गोडसेवर स्तुतीसुमने..म्हणाले ‘गांधीवादाने देशाची..’

गुणरत्न सदावर्तेंकडून नथुराम गोडसेवर स्तुतीसुमने..म्हणाले ‘गांधीवादाने देशाची..’

May 09, 2022, 09:05 PM IST

    • महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेच्या नावाचा उल्लेख सदावर्ते यांनी गोडसेजी असा केला, तर गांधीवादाने देशाची फसवणूक केल्याचं वादग्रस्त वक्तव्यही सदावर्ते यांनी पत्रकार परिषदेत केलं.
वकील गुणरत्न सदावर्ते

महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेच्यानावाचा उल्लेख सदावर्ते यांनी गोडसेजी असा केला,तर गांधीवादाने देशाची फसवणूक केल्याचं वादग्रस्त वक्तव्यही सदावर्ते यांनी पत्रकार परिषदेत केलं.

    • महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेच्या नावाचा उल्लेख सदावर्ते यांनी गोडसेजी असा केला, तर गांधीवादाने देशाची फसवणूक केल्याचं वादग्रस्त वक्तव्यही सदावर्ते यांनी पत्रकार परिषदेत केलं.

मुंबई - एसटी कर्मचारी आंदोलनातून पुढे आलेले वकील गुणरत्न सदावर्ते (gunratna sadavarte) यांनी पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांच्या नावाने राजकारणाच्या  मैदानात उडी घेतली आहे. सदावर्ते यांनी  एस टी कर्मचारी जनसंघ (ST Employees Jan Sangh) अशी संघटना स्थापन केली आहे. यावेळी सदावर्तेंनी नथुराम गोडसेजी (nathuram godse) म्हणत गोडसेवर स्तुतीसुमने उधळली तर गांधीवादावर टीका केली.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेच्या नावाचा उल्लेख सदावर्ते यांनी गोडसेजी असा केला, तर गांधीवादाने देशाची फसवणूक केल्याचं वादग्रस्त वक्तव्यही सदावर्ते यांनी पत्रकार परिषदेत केलं.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवास्थानी हल्ला प्रकरणातून जामिनावर सुटका झाल्यानंतर सदावर्ते पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. आज मुंबईत एसटी कर्मचारी जनसंघ अशी संघटना स्थापन केली. यावेळी सदावर्तेंनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. विशेष म्हणजे, शरद पवारांच्या घरी आंदोलन करणारे एसटी कर्मचारी मोठ्या प्रमाणात या वेळी उपस्थित होते.

सदावर्ते म्हणाले की, आज आम्ही ९२ हजार कष्टकरी नवीन पाऊल उचलत आहोत. आम्ही एक संघटना स्थापन करत आहोते. माझे हे कष्टकरी राज्यातील प्रचारक आहेत हे या सरकारने लक्षात घ्यावं. आम्ही आज एक नवीन संघटनेची घोषणा करणार आहोत. एसटी कष्टकरी जनसंघाचे प्रचारक आगामी निवडणुकीत प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन सरकारविरोधी प्रचार करणार आहेत, असंही सदावर्ते म्हणाले.

सदावर्ते यांनी गांधीवादावर टीका करताना म्हटले की, आम्हाला नेहमी सांगण्यात आलं की एसटी कर्मचाऱ्यांची अवस्था गिरणी कामगारांसारखी होईल. मात्र आम्ही लढाई लढत राहिलो. गांधीवाद्यांनी देशाची आणि महाराष्ट्राची फसवणूक केली आहे देशात एक मोठं षडयंत्र रचण्याचा प्रयत्न गांधीवादी राजकारण्यांनी केला आहे. गांधी यांनी श्वास सोडताना हे राम म्हटलं असं सांगितलं जात आलंय परंतु ज्यावेळी नथुराम गोडसेजी यांची कोर्टात सुनावणी झाली, त्यावेळी गोडसेजी यांनी स्पष्ट केलं होतं की गांधी यांनी श्वास सोडताना कधीही हे राम म्हटलं नव्हतं, असंही सदावर्ते म्हणाले.

आगामी काळात आम्ही सहकार मंत्री अमित शहा यांना भेटणार आहोत. कारण सध्या या सरकारने सांगितलं आहे की अनेक कर्मचारी कर्जबाजारी आहेत त्यामुळे ते मतदान करु शकणार नाहीत मात्र असा कुठलाही नियम नाही. ही बाब आम्ही सहकर मंत्र्यांच्या लक्षात आणून देऊ, असंही सदावर्ते म्हणाले.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या