मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  गुणरत्न सदावर्ते म्हणतात.. मी पण अयोध्येला जाणार, मलाही साधू-महंतांकडून निमंत्रण

गुणरत्न सदावर्ते म्हणतात.. मी पण अयोध्येला जाणार, मलाही साधू-महंतांकडून निमंत्रण

May 11, 2022, 08:52 PM IST

    • गुणरत्न सदावर्तेही अयोध्येचा दौरा करणार आहेत. आपण राम जन्मभूमीच्या केसमध्ये वकील होतो, त्यामुळे आपल्याला अयोध्येतून बोलावणं आलं आहे असं सांगत आपण लवकरच अयोध्येला जाणार आहे, असं गुणरत्न सदावर्तेंनी जाहीर केलं आहे.
गुणरत्न सदावर्ते

गुणरत्न सदावर्तेही अयोध्येचा दौरा करणार आहेत. आपण राम जन्मभूमीच्या केसमध्ये वकील होतो, त्यामुळे आपल्याला अयोध्येतून बोलावणं आलं आहे असं सांगत आपण लवकरच अयोध्येला जाणार आहे, असं गुणरत्न सदावर्तेंनी जाहीर केलं आहे.

    • गुणरत्न सदावर्तेही अयोध्येचा दौरा करणार आहेत. आपण राम जन्मभूमीच्या केसमध्ये वकील होतो, त्यामुळे आपल्याला अयोध्येतून बोलावणं आलं आहे असं सांगत आपण लवकरच अयोध्येला जाणार आहे, असं गुणरत्न सदावर्तेंनी जाहीर केलं आहे.

मुंबई – सध्या राज्याचे राजकारण मशिदीवरील भोंगे व अयोध्या दौऱ्यावरून खंगाळून निघाले आहे. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली आहे. त्यातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही आपली अयोध्या वारी आटोपली. आता अयोध्येला जाणाऱ्या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

आता एसटी कर्मचाऱ्यांचे वकील व नुकतीच तुरुंगवारी करून आलेले गुणरत्न सदावर्तेही अयोध्येचा दौरा करणार आहेत. आपण राम जन्मभूमीच्या केसमध्ये वकील होतो, त्यामुळे आपल्याला अयोध्येतून बोलावणं आलं आहे असं सांगत आपण लवकरच अयोध्येला जाणार आहे, असं गुणरत्न सदावर्तेंनी जाहीर केलं आहे. गुणरत्न सदावर्ते यांची मुंबई पोलिसांनी आज पुन्हा एकदा चौकशी केली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. 

डंके की चोट पर यापुढे विरोधकांना उत्तर -

वकील गुणरत्न सदावर्ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "जय श्रीराम आणि जय भीम म्हणणारे आता कुणालाही घाबरत नाहीत. बँकेची निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे. अयोध्येत आमचं साधू आणि महंत स्वागत करणार आहेत. डंके की चोट पर यापुढे विरोधकांना उत्तर देऊ. आमचे हक्क राज्य सरकार असं पायदळी तुडवू शकत नाहीत. कष्टकरी जनसंघ हे हिंदुस्थानला सुजलाम सुफलाम करण्यासाठी या महिन्याच्या शेवटी अयोध्येला जाणार असून प्रभू श्रीरामांचं दर्शन घेणार आहोत.

वकील सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावून त्यांची पुन्हा एकदा चौकशी केली. यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना यापुढे ‘डंके की चोटपर’ कायदेशीर बाबींना उत्तर देणार असल्याचं मत व्यक्त केलं. यावेळी सदावर्ते यांच्या वकिलांनी सदावर्तेंना दिलेली नोटीस राजकीय हेतूने दिल्याचा आरोप केला. तसेच अद्याप आरोपपत्र दाखल नसताना आणि निकाल लागलेला नसताना अशी नोटीस देऊन कोर्टाचा अवमान होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या