मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Gunaratna sadavarte : अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते शिंदे गटातील आमदाराविरोधात न्यायालयात लढणार

Gunaratna sadavarte : अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते शिंदे गटातील आमदाराविरोधात न्यायालयात लढणार

Sep 28, 2022, 11:35 PM IST

    • अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते(Gunaratna sadavarte) शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांच्याविरुद्ध कोर्टात बाजू मांडणार आहेत. सदावर्ते यांनी शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट (Sanjay shirsat) यांच्यावर कंत्राटदाराला धमकी दिल्याचा आरोप केला आहे.
अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते(Gunaratna sadavarte) शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांच्याविरुद्ध कोर्टात बाजू मांडणार आहेत. सदावर्ते यांनी शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट (Sanjay shirsat) यांच्यावर कंत्राटदाराला धमकी दिल्याचा आरोप केला आहे.

    • अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते(Gunaratna sadavarte) शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांच्याविरुद्ध कोर्टात बाजू मांडणार आहेत. सदावर्ते यांनी शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट (Sanjay shirsat) यांच्यावर कंत्राटदाराला धमकी दिल्याचा आरोप केला आहे.

मुंबई -एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान शरद पवार यांच्यावर केलेल्या आरोप व पवाराच्या निवासस्थानावर हल्ल्यानंतर केलेल्या अटकेमुळे चर्चेत आलेले अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते(Gunaratna sadavarte) शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांच्याविरुद्ध कोर्टात बाजू मांडणार आहेत. सदावर्ते यांनी शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट (Sanjay shirsat) यांच्यावर कंत्राटदाराला धमकी दिल्याचा आरोप केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

आमदारसंजय शिरसाट यांनी औरंगाबादमधील बांधकाम क्षेत्रातील बाबा कंस्ट्रक्शन्स कंपनीला धमकावले आहे, असा आरोप सदावर्ते यांनी केला आहे. विशेष म्हणजे या धमकीप्रकरणाशी निगडित एक कॉल रेकॉर्डिंग आपल्याकडे असल्याचा दावाही सदावर्ते यांनी केला आहे.

आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात न्यायालयात एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. निविदा भरण्यापासून परावृत्त करणे. निविदा भरल्यानंतरही स्वीय सहाय्यकाच्या माध्यमातून धमकावणे, कामात अडथळा निर्माण करणे, असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायधीशांच्या  निवासासाठी इमारत बांधण्यात येत आहे. या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया योग्य पद्धतीने राबवलेली गेली नाही. हे कंत्रात ४७ कोटी रुपयांचे आहे. मात्र याते कंत्राट ज्या कंपनीला देण्यात आले आहे ती अपात्र असल्याचे सदावर्ते यांनी म्हटले आहे.  या कंपनीने निविदा भरताना बीडमध्ये सात मजली रुग्णालयाचे बांधकाम केले नसूनही केल्याचे सांगितले आहे. वर्क ऑर्डर देण्याआधी आमचे पक्षकार बाबा कंस्ट्रक्शन कंपनीला संजय शिरसाट यांच्यापीए ने बोलावून धमकी देण्यात आली. ही बाब न्यायालयाच्या लक्षात आणून देण्यात आली आहे, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

 

पुढील बातम्या