मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ganeshotsav: कोकणवासीयांना खुशखबर.. गणेशोत्सवासाठी चांगले रस्ते, अन् टोलमाफीही

Ganeshotsav: कोकणवासीयांना खुशखबर.. गणेशोत्सवासाठी चांगले रस्ते, अन् टोलमाफीही

Jul 21, 2022, 06:01 PM IST

    • गणेशोत्सव व दहीहंडी दोन्ही सण निर्बंधमुक्त होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली आहे. गणेशोत्सवातील गणेश मूर्तींच्या उंचीवर निर्बंध असणार नाहीत, मंडपांच्या नोंदणी शुल्कात कपात अशा घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
कोकणवासीयांना खुशखबर

गणेशोत्सव व दहीहंडी दोन्ही सण निर्बंधमुक्त होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde)यांनी केली आहे. गणेशोत्सवातील गणेश मूर्तींच्या उंचीवर निर्बंध असणार नाहीत,मंडपांच्या नोंदणी शुल्कात कपात अशा घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

    • गणेशोत्सव व दहीहंडी दोन्ही सण निर्बंधमुक्त होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली आहे. गणेशोत्सवातील गणेश मूर्तींच्या उंचीवर निर्बंध असणार नाहीत, मंडपांच्या नोंदणी शुल्कात कपात अशा घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

मुंबई –  कोरोना संक्रमणामुळे मागील दोन वर्षे सर्वच सण व उत्सवांवर निर्बंध लादण्यात आले होते. त्याचबरोबर यंदाही गणेशमूर्तीच्या उंचीची मर्यादा निश्चित करण्यात आली होती. मात्र राज्यात नव्याने  सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने हिंदू कार्ड खेळले असून गणेशमूर्तीचे सर्व निर्बंध हटवले असून यंदा दहीहंडी (Dahi handi) व गणेशोत्सव (Ganeshotsav) हे उत्सव धुमधडाक्यात साजरे करण्याची तयारी सुरु झाली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Police : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, १०७ कोटी रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त, ४ जणांना अटक

Mumbai Weather Update : मुंबई, ठाण्यात पुढील ४८ तासांत पावसाचा अंदाज, हवामान विभागाकडून यलो अलर्ट

Sambhaji Nagar: मतदानाच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीसांच्या हाती लागलं मोठं घबाड; मोठी रक्कम जप्त

Rain News : प्रचारसभांत पावसाचे विघ्न! राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचे थैमान, पिकांचे मोठे नुकसान

यंदा हे दोन्ही सण निर्बंधमुक्त होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली आहे. गणेशोत्सवातील गणेश मूर्तींच्या उंचीवर निर्बंध असणार नाहीत,  मंडपांच्या नोंदणी शुल्कात कपात अशा घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तसेच कोकणात गणेशोत्सवाची विशेष धूम पाहावयास मिळते. त्यामुळे सरकारकडून  कोकणवासियांसाठीही विशेष सुविधा पुरवण्यात येणार आहेत.  पुणे, मुंबईतील चाकरमानी  कोकणात गणेशोत्सवसासाठी मोठ्या प्रमाणात जात असतात. त्यांना योग्य सुविधा देण्याची घोषणा करण्यात आली आहे. 

मुंबई – गोवा महामार्गाचे काम युद्ध पातळीवर -

गणेशोत्सवाच्या आधीपासून कोकणवासिय मोठ्या संख्येने कोकणात जात असतात. मुंबई – गोवा महामार्गाचे काम गेले अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. त्यामुळे अशा स्थितीत दरवर्षी हा रस्ता चांगले नसल्याची ओरड करण्यात येत असते. यावेळी मात्र या रस्त्याचे काम युद्धगतीने सुरु असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच याबाबत राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांशी बोलणे झाले असून, यावेळी कोकणात जाणारे रस्ते चांगले असतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

कोकणात जाणाऱ्यांना गणेशोत्सवात टोलमाफी -

दरवर्षी प्रमाणे मुंबई, पुणे, कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्यांना टोलमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांना टोलमाफीचा निर्णय घेण्यात येतो आहे. यावेळी आषाढी एकादशीला पंढरपुरला जाणाऱ्यांसाठीही टोलमाफीच्या निर्णयाची घोषणा करण्यात आली होती.

गणेशोत्सवसाठी जादा बसेसची सुविधा - 

गणेशोत्सवासाठी यावर्षीही कोकणात जास्त बसेस पाठवल्या जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. याबाबत एसटीच्या अधिकाऱ्यांनाही बैठकीत निर्देश दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

पुढील बातम्या