मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune rape : वडिलांनी उपचारासाठी घेतलेले पैसे देऊ न शकल्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार; देहविक्रीस भाग पाडले

Pune rape : वडिलांनी उपचारासाठी घेतलेले पैसे देऊ न शकल्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार; देहविक्रीस भाग पाडले

Feb 15, 2024, 07:22 PM IST

    • Pune Girl rape : पुण्यात एक संतपाजनक घटना उघडकीस आली आहे. वडिलांच्या उपचारासाठी घेतलेले पैसे परत न करता आल्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पती-पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
rape victim

Pune Girl rape : पुण्यात एक संतपाजनक घटना उघडकीस आली आहे. वडिलांच्या उपचारासाठी घेतलेले पैसे परत न करता आल्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पती-पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    • Pune Girl rape : पुण्यात एक संतपाजनक घटना उघडकीस आली आहे. वडिलांच्या उपचारासाठी घेतलेले पैसे परत न करता आल्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पती-पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Girl rape : सुसंस्कृत पुण्याला प्रतिमेला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. वडीलांच्या उपचारासाठी शेजाऱ्यांकडून उसने घेतलेले पैसे परत फेडता न आल्यामुळे तिला तब्बल १५ दिवस डांबून ठेऊन वेगवेळ्या ठिकाणी नेत बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एवढेच नाही तर पैसे वसूलीसाठी मुलीला जबरदस्तीने देहविक्री देखील करण्यास भाग पाडले. या प्रकरणी आरोपी शेजारी पती पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याना अटक करण्यात आली आहे. ही घटना पुण्यातील धनकवडी परिसरात घडली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Manoj jarange patil : ..अन्यथा २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; जरांगेंनी विधानसभेचा फॉर्म्युलाच सांगितला

Pandharpur news : भाविकांसाठी आनंदवार्ता! पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार सुरू

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

Pune Urulikanchan news : वीज कडाडल्याच्या आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

पत्नी व जुळ्या मुलांची हत्या करून माजी मेटा इंजिनियरची अमेरिकेत आत्महत्या; अमेरिकेत हत्याकांडाचा खुलासा

याबाबत कात्रज येथे राहणाऱ्या १७ वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीने बुधवारी (दि. १४) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन आकाश सुरेश माने (वय २४), पुनम आकाश माने (वय २२, रा.शंकराच्या मंदिराजवळ, कात्रज गावठाण, कात्रज) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुनम माने हिला अटक करण्यात आली आहे. ही घटना ऑक्टोबर २०२३ ते १४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत पीडित मुलीच्या घरी, के.के.मार्केट, धनकवडी येथे घडला.

Electoral Bonds: सुप्रीम कोर्टाचा केंद्राला झटका; गुप्त देणगीची ‘इलेक्टोरल बॉण्ड’ योजना केली रद्द

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीने तिच्या वडिलांच्या आजारपणासाठी शेजारी राहणाऱ्या आरोपींकडून ३० हजार रुपये उधार घेतले होते. मात्र, हे पैसे दिलेल्या मुदतीत परत करता आले नाही. यामुळे आरोपींनी पीडित मुलीचे अपहरण करत तिला पळून नेट के.के.मार्केट येथील एका लॉजमध्ये नेले. या ठिकाणी तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तब्बल १० ते १५ दिवस हा प्रकार सुरू होता. आरोपींनी ‘माझे पैसे दे, नाही दिले तर कुठुनही वसुल करुन दे, तुला सोडणार नाही’ अशी धमकी देत तिला जबरदस्तीने देहव्यापार करण्यास भाग पाडले.

तिला विविध लोकांसोबत शरीरक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडून त्यांच्या कडून पैसे घेत दोघे कर्जाची रक्कम वसूल करत होते. दरम्यान हा प्रकार वर्षभर सुरू होता. अखेर पीडित मुलीने भारती विद्यापीठात धाव घेत तिने तिच्यावर बेतलेला प्रसंग कथन केला. यानंतर पोलिसांनी लैंगिक अत्याचार, अपहरणासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. पाटील करीत आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या