मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  गणपती पावला..! कोकणात जाणाऱ्यांचा वेळ वाचणार, मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातून वाहतूक सुरू

गणपती पावला..! कोकणात जाणाऱ्यांचा वेळ वाचणार, मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातून वाहतूक सुरू

Sep 10, 2023, 11:04 PM IST

  • Traffic in kashedi tunnel start : १० सप्टेंबरपासून कशेडी बोगदा वाहतुकीसाठी सिंगल लेन सुरू झाला आहे. या बोगद्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जवळपास ४५ मिनिटांचा वेळ वाचणार आहे.

kashedi tunnel

Traffic in kashedi tunnel start : १०सप्टेंबरपासून कशेडी बोगदा वाहतुकीसाठी सिंगल लेन सुरू झाला आहे. या बोगद्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जवळपास४५मिनिटांचा वेळ वाचणार आहे.

  • Traffic in kashedi tunnel start : १० सप्टेंबरपासून कशेडी बोगदा वाहतुकीसाठी सिंगल लेन सुरू झाला आहे. या बोगद्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जवळपास ४५ मिनिटांचा वेळ वाचणार आहे.

Mumbai Goa Highway : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक खुशखबर आहे. मुंबई-गोवा महामार्गावरच्या कशेडी बोगद्यातील वाहतूक आजपासून सुरू झाली आहे. आजपासून (१० सप्टेंबर) कशेडी बोगदा वाहतुकीसाठी सिंगल लेन सुरू झाला आहे. या बोगद्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जवळपास ४५ मिनिटांचा वेळ वाचणार आहे. हा बोगदा पार करण्यासाठी केवळ ९ ते १० मिनिटांचा वेळ लागणार असून ९ किलोमीटर अंतर वाचणार आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

पोलादपूर येथील भोगावपासून सुरु होणारा कशेडी बोगदा खेड मधील कशेडी येथे बाहेर पडणार आहे. हा बोगदा एकूण दोन किलोमीटरचा असून या बोगद्याला असलेले रस्ते धरून हा सगळा मार्ग ९ किलोमीटरचा आहे. ९ किलोमीटरच्या मार्गामुळे प्रवाशांचा सुमारे ४० ते ४५ मिनिटांचा वळसा वाचणार आहे. कशेडी घाट सुरू झाल्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे. बोगद्यामुळे खेड तालुक्यातील कशेडी घाट ते रायगड जिल्ह्यातील पोलादपूर हे अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार करता येणार आहे.

कशेडी घाट पार करायला पाऊण तासांचा वेळ लागतो बोगद्यामुळे हा प्रवास अवघ्या १० मिनिटात पार पडेल. त्याचबरोबर अपघातांचा धोका देखील टळणार आहे. कशेडी घाट रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्हयांना जोडणारा अवघड वळणांचा मार्ग आहे. रस्ता रूंद असला तरी तीव्र उतारांमुळे घाटाचा मार्ग पार करताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. या मार्गावरून लहान मोठया सर्वच प्रकारच्या वाहनांची मोठी वर्दळ असते. तळकोकणात जाणारे प्रवासी याच मार्गाचा अवलंब करतात. कशेडी बोगदा वाहतुकीसाठी सुरु झाल्यामुळे प्रवाशांची कसरत वाचणार आहे. 

मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाट तब्बल २० किलोमीटर लांबीचा घाट आहे. धोकादायक वळणं असलेल्या या घाटातून  पावसाळ्यात प्रवास करणं खूप धोकादायक असतं. कशेडी घाटाला पर्याय म्हणून नवा बोगदा तयार केला जात आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या