मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik Ganesh Visarjan : नाशिकमध्ये विसर्जन मिरवणुकीला गालबोट.. तीन घटनांमध्ये पाच तरुण बुडाले

Nashik Ganesh Visarjan : नाशिकमध्ये विसर्जन मिरवणुकीला गालबोट.. तीन घटनांमध्ये पाच तरुण बुडाले

Sep 28, 2023, 11:11 PM IST

  • Nashik Ganesh Visarjan 2023 : नाशिकमध्ये तीन वेगवेगळ्या घटनेत पाच तरुण बुडाले आहेत. गंगा घाट व वालदेवी धरणात चार जण बुडाले तर चेहेडी संगमेश्वर परिसरात एक महाविद्यालयीत तरुण बुडाला.

Nashik Ganesh Visarjan

Nashik GaneshVisarjan 2023 : नाशिकमध्ये तीन वेगवेगळ्या घटनेत पाच तरुण बुडाले आहेत. गंगा घाट व वालदेवी धरणात चार जण बुडाले तर चेहेडी संगमेश्वर परिसरात एक महाविद्यालयीत तरुण बुडाला.

  • Nashik Ganesh Visarjan 2023 : नाशिकमध्ये तीन वेगवेगळ्या घटनेत पाच तरुण बुडाले आहेत. गंगा घाट व वालदेवी धरणात चार जण बुडाले तर चेहेडी संगमेश्वर परिसरात एक महाविद्यालयीत तरुण बुडाला.

नाशिक : गणेश विसर्जन मिरवणुकी मोठ्या उत्साहात सुरू असताना राज्यातील अनेक ठिकाणी या उत्सवाला गालबोट लागल्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबईत वीज पडून एकाचा मृत्यू, रायगडमध्ये चार जण वाहून गेले, रत्नागिरीत अनियंत्रित टेम्पो मिरवणुकीत घुसून दोघांचा मृत्यू या घटनानंतर आता नाशिक जिल्ह्यातही दुर्घटना घडल्या आहेत. नाशिकमध्ये तीन वेगवेगळ्या घटनेत पाच तरुण बुडाले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Panvel Rape: पॉर्न पाहून अल्पवयीन भावाचा मोठ्या बहिणीवर बलात्कार; गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उजेडात!

Mumbai Weather Update: मुंबई, ठाण्यात आज उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरकून घ्या मतदान

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

चेहेडी संगमेश्वर परिसरात एक महाविद्यालयीत तरुण बुडाला आहे. पंचवटीत गाडगे महाराज पुलाखाली बुडालेल्या दोघांचा शोध सुरू आहे. गुरुवारी दिवसभरात वेगवेगळ्या तीन घटनेतील दोघांचे मृतदेह मिळाले असून इतर तिघांचा शोध सुरू आहे. शहरातील गोदावरी नदीत दोन आणि इगतपुरीतील वालदेवी धरणात दोन गणेशभक्त बुडाल्याची घटना समोर आली आहे.

अनंत चतुदर्शीनिमित्त गुरुवारी सकाळपासून गणेश विसर्जन मिरवणुकी मोठ्या उत्साहात सुरू होत्या. मात्र विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागल्याची घटना सायंकाळच्या सुमारास घडली आहे. शहरातील रामकुंड परिसरातील गाडगे महाराज पुलाजवळील घाटावर दोन जण बुडाले. हे गणेश भक्त मूर्ती विसर्जनासाठी गेले होते. त्यांची शोधमोहीम अजूनही सुरूच आहे.

दुसऱ्या एका घटनेत इगतपुरी तालुक्यातील वालदेवी धरणात दोन तरुण बुडाले आहेत. या दोघांचेही मृतदेह धरणातून बाहेर काढले आहेत. यंदा वालदेवी धरण परिसरात विसर्जनासाठी प्रशासनाने बंदी घातली होती, तरीही नागरिकांकडून मोठ्या संख्येने येथे जमून गणेश विसर्जन केले. त्याच आता हा अपघात झाल्याचे समोर आला आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या