मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ganesh Visarjan 2023: पुण्याच्या मानाच्या गणपतीचा शाही थाट! गणपतींचे ढोल ताशांच्या निनादात उत्साहात विसर्जन

Ganesh Visarjan 2023: पुण्याच्या मानाच्या गणपतीचा शाही थाट! गणपतींचे ढोल ताशांच्या निनादात उत्साहात विसर्जन

Sep 29, 2023, 11:07 AM IST

    • Ganesh Visarjan 2023: पुण्यात मानाच्या गणपतीचे जल्लोषात विसर्जन करण्यात आले, सकाळी १०.३५ ला झालेली विसर्जन मिरवणूक आज देखील सुरू आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी हजारो पुणेकर शहरात आले होते.
Ganesh Visarjan 2023

Ganesh Visarjan 2023: पुण्यात मानाच्या गणपतीचे जल्लोषात विसर्जन करण्यात आले, सकाळी १०.३५ ला झालेली विसर्जन मिरवणूक आज देखील सुरू आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी हजारो पुणेकर शहरात आले होते.

    • Ganesh Visarjan 2023: पुण्यात मानाच्या गणपतीचे जल्लोषात विसर्जन करण्यात आले, सकाळी १०.३५ ला झालेली विसर्जन मिरवणूक आज देखील सुरू आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी हजारो पुणेकर शहरात आले होते.

पुणे : ढोल ताशांचा निनाद, पारंपरिक खेळ, तसेच विविध समाजप्रबोधन देखावे सादर करत पुण्यातील पाच मानाच्या गणपतीचे शिस्तबद्ध विसर्जन करण्यात आले. सकाळी १०: १५ वाजता पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला कसबा गणपती पारंपरिक पद्धतीने पालखीमध्ये मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते पुजा करून या मिरवणुकीला सुरूवात करण्यात आली. दुपारनंतर ४ च्या सुमारास वरूणराजाने हजेरी लावली. भर पावसात पुणेकरांनी गणपती बाप्पाला निरोप दिला.

ट्रेंडिंग न्यूज

Pune porsche Accident : दोघांना चिरडणाऱ्या बिल्डरच्या मुलाला जामीन; न्यायालयाने आरोपीला लिहायला लावला ३०० शब्दांचा निबंध

Panvel Rape: पॉर्न पाहून अल्पवयीन भावाचा मोठ्या बहिणीवर बलात्कार; गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उजेडात!

Mumbai Weather Update: मुंबई, ठाण्यात आज उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरकून घ्या मतदान

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

Maharashtra weather update: राज्यात पुढील ७२ तासांत मुसळधार पाऊस बरसणार! या जिल्ह्यांना दिला ऑरेंज अलर्ट

दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील गणेश विसर्जन मिरवणुकीत पुणेकरांचा उत्साह द्विगुणित झाला होता. मोठा प्रमाणात नागरिक पुण्यात आले होते. सकाळपासून गणेश मंडल विसर्जन मिरवणूक रांगेत लागले होते. मानाचा पहिला असलेल्या कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला १०.१५ मिनिटांनी सुरुवात केली होती. ढोलताशांच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात झाली. ४:३५ वाजता कसबा गणपतीचे विसर्जन झाले.

Manipur Violence : मणीपुर येथे आंदोलकांचा थेट मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या घरावर हल्ला; सुरक्षा रक्षकांचा गोळीबार

मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीची ११ वाजता मिरवणूक सुरू झाली. या पथकात देखील आकर्षक देखावे यांनी ढोल ताशा पटकाच्या शिस्तबद्ध वादनाने उपस्थितांची माने जिंकली. या गणपतीचे ५ :१० वाजाता विसर्जन झाले.

मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती १२ वाजता मिरवणुक सुरू झाली. अतिशय जल्लोषात सुरू असलेली मिरवणूक रात्री ५: ५५ वाजता पावसाच्या सरीमद्धे समारोप झाला.

मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीची विसर्जन मिरवणूक १ वाजता सुरू झाली. तर ६:३२ वाजता विसर्जन झाले. या गणपतीचे विसर्जन झाले. अतिशय आकर्षक अशा रथातून या गणपतीची वैभवी मिरवणूक काढण्यात आली होती.

मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती २:१५ मिरवणूक सुरू झाली तर तब्बल भर पावसात ६:४५ वाजता या मंडळाच्या गणरायचे विसर्जन झाले.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या