मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  National Teacher Award 2023 : राज्यातील पाच शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मान

National Teacher Award 2023 : राज्यातील पाच शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मान

Sep 05, 2023, 09:17 PM IST

  • national teacher award : महाराष्ट्रातील पाच शिक्षकांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२३ चे ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. 

national teacher award

national teacher award : महाराष्ट्रातील पाच शिक्षकांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष२०२३चे ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला.

  • national teacher award : महाराष्ट्रातील पाच शिक्षकांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२३ चे ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. 

शिक्षक दिनानिमित्त महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२३ चे  ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. शालेय, उच्च व कौशल्य शिक्षण अधिक सुलभ आणि गुणात्मक होण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Urulikanchan news : वीज पडल्याचा आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

Malad Woman Found Dead: मालाडमध्ये राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

Pune BGF jewellers daroda : वानवडीतील वाडकर मळा येथील बीजीएफ ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा; ३०० ते ३५० ग्रॅम दागिने लंपास

Mumbai Water Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा; गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले भागांतील पाणीकपातीचा निर्णय रद्द

शालेय विभागात आंबेगाव पुणे येथील,जि ल्हा परिषद शाळेच्या मृणाल नंदकिशोर गांजळे,उच्च शिक्षण विभागात व्हीजेटीआय मुंबईतील केशव काशिनाथ सांगळे,धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात स्थित आरसी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन आणि संशोधन संस्थेतील डॉ. चंद्रगौडा रावसाहेब पाटील, आयआयटी मुंबईतील डॉ. राघवन बी. सुनोज तसेच कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागात मुंबईतील लोअर परेल येथील गव्हर्नमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या निर्देशक स्वाती देशमुख या शिक्षकांना पुरस्कार देण्यात आला.

शैक्षणिक मोबाईल App,उच्च गुणवत्तापूर्ण ई-सामुग्री निर्मिती,दृष्य व श्राव्य सामुग्री निर्मिती, संगणक, दूरचित्रवणी, यु-ट्युब, आकाशवाणी, सॉफ्टवेयर, हार्डवेयर आदिंचा उपयोग करून शालेय शिक्षण सुलभ, गुणात्मक आणि संशोधनात्मक बनविणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.

 

नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात ‘राष्ट्रीय शिक्षक दिना’च्या निमित्त केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार'वितरण समारोहाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शालेय शिक्षण राज्यमंत्री अन्नपुर्णा देवी,डॉ. सुभाष सरकार, डॉ. राजकुमार रंजन सिंह यासह वर‍िष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या