मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Local Train : मुंबईतील पाच लोकल रेल्वे अचानक रद्द, कामावर जाणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप

Mumbai Local Train : मुंबईतील पाच लोकल रेल्वे अचानक रद्द, कामावर जाणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप

Jun 21, 2023, 09:17 AM IST

    • Mumbai Local Train : मुंबईत आज रेल्वेने अचानक मेगाब्लॉक घेतला असून तब्बल पाच रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहे.
Mumbai Local Train Live Updates (HT)

Mumbai Local Train : मुंबईत आज रेल्वेने अचानक मेगाब्लॉक घेतला असून तब्बल पाच रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहे.

    • Mumbai Local Train : मुंबईत आज रेल्वेने अचानक मेगाब्लॉक घेतला असून तब्बल पाच रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहे.

Mumbai Local Train Live Updates : गेल्या रविवारी भारतीय रेल्वे मुंबईतील तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेतला होता. त्यानंतर आता आज अचानक मुंबईतील तीन लोकल रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम रेल्वेच्या सफाळे रेल्वे स्थानकात रेल्वे उड्डाणपूल उभारण्याच्या कामासाठी लोकल रद्द करण्यात आल्या आहे. आज म्हणजेच बुधवारी सकाळी ८.४० ते १०.४० वाजपेर्यंत रेल्वेकडून विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. उड्डाणपूल आणि पाच गर्डर उभारण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे. दुपार दोन ते तीन वाजेपर्यंत रद्द झालेल्या लोकल गाड्या सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Panvel Rape: पॉर्न पाहून अल्पवयीन भावाचा मोठ्या बहिणीवर बलात्कार; गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उजेडात!

Mumbai Weather Update: मुंबई, ठाण्यात आज उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरकून घ्या मतदान

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

कोणत्या लोकल रेल्वे रद्द होणार?

मुंबईतील विरार ते चर्चगेट दरम्यान दुपारी १२ वाजता धावणारी रेल्वे रद्द करण्यात आली आहे. तसेच बोईसर-वसई रोड मेमू, डहाणू रोड-चर्चगेट, चर्चगेट-डहाणू रोड आणि सुरत-विरार एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. त्यामुळं सकाळपासून कामावर जाणाऱ्या मुंबईकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. परिणामी पश्चि मुंबईतील अनेक ठिकाणी तुफान वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. पाच लोकल रद्द करण्यात आल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. याशिवाय अहमदाबाद-मुंबई सेंट्रल कर्णावती एक्स्प्रेस, भुज-वांद्रे टर्मिनस, इंदूर-कोचुवेली एक्स्प्रेस आणि जोधपूर-वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस या चार रेल्वे एक ते दीड तासांपर्यंत वेगवेगळ्या स्थानकांमध्ये थांबवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

काही दिवसांपूर्वीच मुंबईत दोन ठिकाणी गर्डर टाकण्याच्या कामासाठी रेल्वेने विशेष मेगाब्लॉक घेतला होता. मुंबईसह उपनगरांच्या भागांमध्येही रेल्वेकडून रुळांची देखभाल व दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येत असतं. त्यातच आता पश्चिम मुंबईतील पाच लोकल रेल्वे रद्द करण्यात आल्याने मुंबईकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळं आता आज दुपारी दोन किंवा तीन वाजेपर्यंत रद्द झालेल्या लोकल सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.

पुढील बातम्या