मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  हृदयद्रावक! ‘एकच मिशन, मराठा आरक्षण‘ चिठ्ठी लिहून तीन मुलांच्या पित्यानं संपवलं जीवन

हृदयद्रावक! ‘एकच मिशन, मराठा आरक्षण‘ चिठ्ठी लिहून तीन मुलांच्या पित्यानं संपवलं जीवन

Oct 25, 2023, 10:27 PM IST

  • Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी तीन मुलांच्या वडिलांनी धक्कादायक पाऊल उचलत आपलं जीवन संपवलं आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

maratha reservation

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी तीन मुलांच्या वडिलांनी धक्कादायक पाऊल उचलत आपलं जीवन संपवलं आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी तीन मुलांच्या वडिलांनी धक्कादायक पाऊल उचलत आपलं जीवन संपवलं आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

धाराशिव - नांदेड , मुंबई व परभणी येथे मराठा आरक्षणासाठी तरुणांनी आपले जीवन संपवल्याच्या घटना ताज्या असतानाच आजा धाराशीवमधूनही अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘एकच मिशन, मराठा आरक्षण’अशी सुसाईट नोट लिहून तीन मुलांच्या पित्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. भूम तालुक्यातील निपाणी येथे ही घटना घडली आहे. तरुणानं शेतातील झाडाला गळफास घेत जीवन संपवलं आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी (२५ ऑक्टोबर) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.

ट्रेंडिंग न्यूज

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

Worli Rape: नोकरीचे आमिष दाखवत तरुणीला जाळ्यात अडकवलं, भेटायला बोलवून बलात्कार; वरळीतील घटना

प्रवीण काकासाहेब घोडके (वय ३६) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. घोडके हे शेती करत होते. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी, अशी तीन अपत्ये आहेत.राज्यात मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा चिघळत चाललं असून मराठा बांधव आक्रमक झाला आहे. प्रवीण घोडकेही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलन सक्रिय सहभागी असायचे. यावेळी मराठ्यांना कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळणारच, असे ते छातीठोकपणे सांगत होते. मात्र, सरकारने ३० दिवसांच्या मुदतीतही मराठा समाजाला आरक्षण दिलं नसल्यानं प्रवीण घोडके निराश झाले होते. याच नैराश्यातून त्यांनी बुधवारी दुपारच्या सुमारास शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं.

घटनास्थळी ग्रामस्थ व मराठा समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. घोडके यांच्या खिशातएक चिठ्ठी आढळून आली. ‘त्या’ चिठ्ठीत ‘एकच मिशन, मराठा आरक्षण’ असा मजकूर आहे.

दरम्यान, चिठ्ठीतील उर्वरित मजकूर सांगण्यास पोलिसांनी नकार दिला. ईट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या