मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Two Wheeler Accident : दुचाकी खोल खड्ड्यात कोसळल्यानं अपघात; बाप-लेकीसह गर्भातील बाळाचा मृत्यू

Two Wheeler Accident : दुचाकी खोल खड्ड्यात कोसळल्यानं अपघात; बाप-लेकीसह गर्भातील बाळाचा मृत्यू

Jan 04, 2023, 12:17 PM IST

    • Two Wheeler Accident : गर्भवती मुलीला घेऊन बालाजी रासवते हे दुचाकीवरून घराच्या दिशेनं निघाले होते. परंतु राष्ट्रीय महामार्गावर येताच दुचाकी रस्त्यालगत असलेल्या खोल खड्ड्यात कोसळली.
Two Wheeler Accident Kandhar Nanded (HT)

Two Wheeler Accident : गर्भवती मुलीला घेऊन बालाजी रासवते हे दुचाकीवरून घराच्या दिशेनं निघाले होते. परंतु राष्ट्रीय महामार्गावर येताच दुचाकी रस्त्यालगत असलेल्या खोल खड्ड्यात कोसळली.

    • Two Wheeler Accident : गर्भवती मुलीला घेऊन बालाजी रासवते हे दुचाकीवरून घराच्या दिशेनं निघाले होते. परंतु राष्ट्रीय महामार्गावर येताच दुचाकी रस्त्यालगत असलेल्या खोल खड्ड्यात कोसळली.

Two Wheeler Accident Kandhar Nanded : गर्भवती लेकीला बाळंतपणासाठी घरी घेऊन येत असलेल्या बाप-लेकीवर काळानं घाला घातला आहे. नांदेड जिल्ह्यातील सोमासवाडीचे रहिवासी बालाजी रासवते आणि त्यांच्या गर्भवती मुलीचा दुचाकीच्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर नांदेडमध्ये शोककळा पसरली आहे. गेल्या वर्षीत बालाजी रासवते यांच्या मुलीचा विवाह झाला होता. परंतु आता बाप-लेकीसह गर्भातील बाळाचाही मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pradeep Sharma : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना आधी जन्मठेप अन् आता ‘सुप्रीम’ दिलासा

Mumbai Crime News: विरारमध्ये मद्यधुंद होऊन धिंगाणा घालणाऱ्या तीन तरुणींना अटक; पोलिसांना शिवीगाळ करत मारहाण

Narendra Dabholkar Case : नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाच्या निकालावर अंनिस अन् दाभोलकर कुटुंबियांची भूमिका

Weather Update: मुंबईत ४ ते ५ दिवस अवकाळीची शक्यता; पुणे, संभाजीनगर, सांगली , नगरसह अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपले

मिळालेल्या माहितीनुसार, मयत बालाजी रासवते हे त्यांची गर्भवती मुलगी राजश्रीला दुचाकीवर घेऊन उदगीरहून सोमासवाडीच्या दिशेनं निघाले होते. परंतु ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर आले असता अचानक दुचाकी रस्त्याच्या बाजूला कलंडली. त्यामुळं रस्त्यालगत असलेल्या खोल खड्ड्यात दुचाकी पडल्यानं बालाजी यांच्यासह त्यांच्या गर्भवती मुलीचाही मृत्यू झाला आहे. राजश्रीचा गेल्या वर्षाीच विवाह झाला होता. राजश्री सात महिन्यांची गर्भवती असल्यानं वडील बालाजी तिला बाळंतपणासाठी माहेरी आणत होते. त्यावेळी दुर्दैवानं हा अपघात झाल्यानंतर दोघांचाही मृत्यू झाला आहे.

बालाजी रासवते यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर मार लागला तर राजश्रीच्या पोटाला मार लागला. परंतु वेळेवर उपचार न मिळाल्यानं दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. त्यानंतर सकाळी व्यायामासाठी जाणाऱ्या काही तरुणांना रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात दोन मृतदेह पडल्याचं लक्षात येताच त्यांनी याबाबतची माहिती जळकोट पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची चौकशी केली असून दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जळकोट येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहेत.

पुढील बातम्या