मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uddhav Thackeray : आधी आमदार फुटायचे, आता पक्ष पळवला जातोय; ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

Uddhav Thackeray : आधी आमदार फुटायचे, आता पक्ष पळवला जातोय; ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

Jul 09, 2023, 01:51 PM IST

    • Uddhav Thackeray Poharadevi Visit : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोनदिवसीय विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी भाजपसहित शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.
Uddhav Thackeray Poharadevi Visit (HT)

Uddhav Thackeray Poharadevi Visit : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोनदिवसीय विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी भाजपसहित शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.

    • Uddhav Thackeray Poharadevi Visit : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोनदिवसीय विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी भाजपसहित शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.

Uddhav Thackeray In Poharadevi Digras : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह पक्षातील आठ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळं राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचा दौरा सुरू केला आहे. तसेच शिवसेनेतील बंडानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील राज्याचा दौरा सुरू केला आहे. उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय विदर्भाच्या दौऱ्यावर गेले आहे. यात ते वाशिम, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. त्यापूर्वी ठाकरेंनी यवतमाळमध्ये पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Porsche Accident : पोर्शे कार अपघातातील मृत जोडप्यावर अंत्यसंस्कार, तरुणाच्या भावाचे पोलिसांवर गंभीर आरोप

Pune car accident : पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासन हलले! 'त्या' दोन पब्सना टाळे ठोकण्याचे आदेश

Pune Car Accident : पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना पुणे पोलिस आयुक्तांचे खुले चॅलेंज! म्हणाले….

Latur News : कौटुंबिक कलहातून १४ वर्षांच्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल! क्लासच्या चवथ्या मजल्यावरून उडी मारून संपवले जीवन

यवतमाळमध्ये माध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आधी आमदार किंवा पक्ष फुटायचा, आता पक्षच पळवला जातो आहे. राजकारणात फोडाफोडी काही नवीन नाही. परंतु असा प्रकार पहिल्यांदाच पाहायला मिळत असल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. सध्या राज्यात जे घडतंय, ते चुकीचं असल्याचं अनेक लोक मला येऊन सांगाताहेत. महाराष्ट्रासह देशातील असंख्य शिवसैनिक मला मातोश्रीवर भेटत आहे. त्यामुळं मी आता कार्यकर्त्यांशी बोलण्यासाठी आणि भेटण्यासाठी बाहेर पडल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. सध्या आमच्या शिवसेनेत सांगली, सातारा आणि सोलापुरातील अनेक कार्यकर्ते प्रवेश करत आहे. ज्यांच्यावर मी अन्याय केला, त्यांना मोठी संधी मिळत असल्याचं ठाकरेंनी म्हटलं आहे.

पीक तुमचं असेल शेती आमचीय- ठाकरे

शिवसेनेतील आमदार फुटले असतील परंतु जसं आमचे नितीन देशमुखांनी जसं सांगितलं की, पीक तुमचं असेल परंतु शेती आमची आहे ना, त्यामुळं तिकडे कितीही लोकं गेले असतील तर आम्ही नव्याने पक्ष उभा करणार असल्याचंही ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. बाळासाहेबांचं नाव घेऊन राजकारण करत असलेले लोक आज सत्तेत आहे, परंतु बाळासाहेबांना अटक करणाऱ्या छगन भुजबळांच्या मांडीला मांडी लावून कोण बसलंय?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला केला आहे. त्यामुळं आता यावरून शिंदे आणि ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे.

पुढील बातम्या