मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uddhav Thackeray Vidarbha : विदर्भातून उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, पोहरादेवीचं दर्शन घेत बंडखोरांविरुद्ध रणशिंग फुंकणार

Uddhav Thackeray Vidarbha : विदर्भातून उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, पोहरादेवीचं दर्शन घेत बंडखोरांविरुद्ध रणशिंग फुंकणार

Jul 09, 2023, 10:38 AM IST

    • Uddhav Thackeray Vidarbha Visit : शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात ठाकरे गटाकडून जाहीर सभा घेण्यात येणार आहे.
Uddhav Thackeray Vidarbha Visit (HT_PRINT)

Uddhav Thackeray Vidarbha Visit : शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात ठाकरे गटाकडून जाहीर सभा घेण्यात येणार आहे.

    • Uddhav Thackeray Vidarbha Visit : शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात ठाकरे गटाकडून जाहीर सभा घेण्यात येणार आहे.

Uddhav Thackeray Vidarbha Visit : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह आठ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. परिणामी राष्ट्रवादीत उभी फूट पडली असून त्यानंतर आता शरद पवारांनी राज्याचा दौरा सुरू केला आहे. ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आता विदर्भाचा दौरा सुरू केला आहे. उद्धव ठाकरे दोनदिवसीय विदर्भाच्या दौऱ्यावर गेले आहे. पोहरादेवीचं दर्शन घेतल्यानंतर ते मंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. त्यामुळं आता शिंदे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकाचवेळी राज्याच्या दौऱ्यावर निघाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Boat sank in Bhima : वादळामुळे भीमा नदीत उजनी धरणात बोट उलटली; ६ जण बुडाले, एकाने पोहून वाचवले प्राण

Nashik News : इगतपुरीमध्ये धक्कादायक घटना, भावली धरणात बुडून ५ जणांचा मृत्यू, ३ तरुणींचा समावेश

Pune Porsche Car Case : पुण्यातील घटनेबाबत राहुल गांधीनी पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केला संताप; म्हणाले...

Gondia Accident : दारूच्या नशेनं घेतला आणखी एक बळी, गोंदियात कपडे धूत असलेल्या महिलेला ट्रॅक्टरनं चिरडलं

उद्धव ठाकरे दोन दिवस विदर्भात असतील. यावेळी ते यवतमाळमध्ये कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे. त्यानंतर वाशिमधील पोहरादेवीचं उद्धव ठाकरे हे दर्शन घेतील. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांच्या दिग्रस मतदारसंघात उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार आहे. यावेळी ते दिग्रसमध्ये संजय राठोड यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या उमेदवाराचं नावही फायनल करणार असल्याची चर्चा आहे. दिग्रसमधून उद्धव ठाकरे थेट अमरावतीसाठी दाखल होणार आहे. त्यामुळं आता उद्धव ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यानंतर येवल्यात जाहीर सभा घेतली आहे.

शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी आणि मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात ठाकरे गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे विदर्भात जाहीर सभा घेत बंडखोर आमदारांचा पराभव करण्यासाठी रणनीती आखणार आहे. त्यामुळं आता उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे एकाचवेळी राज्याच्या दौऱ्यावर निघाल्याने सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुढील बातम्या