मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit Pawar : अजित पवारांची लिफ्ट चौथ्या मजल्यावरून कोसळली, भयानक अपघातातून थोडक्यात बचावले

Ajit Pawar : अजित पवारांची लिफ्ट चौथ्या मजल्यावरून कोसळली, भयानक अपघातातून थोडक्यात बचावले

Jan 15, 2023, 09:08 PM IST

  • Ajit pawar elevator accident : पुण्यात एका रुग्णालयात गेल्यानंतर अजित पवारांची लिफ्ट चौथ्या मजल्यावरून खाली कोसळली. मात्र या भीषण अपघातातून अजित पवार थोडक्यात बचावले, अशी माहिती त्यांनी स्वत:च दिली आहे.

अजित पवार

Ajit pawar elevator accident : पुण्यात एका रुग्णालयात गेल्यानंतर अजित पवारांची लिफ्ट चौथ्या मजल्यावरून खाली कोसळली. मात्र या भीषण अपघातातून अजित पवार थोडक्यात बचावले, अशी माहिती त्यांनी स्वत:च दिली आहे.

  • Ajit pawar elevator accident : पुण्यात एका रुग्णालयात गेल्यानंतर अजित पवारांची लिफ्ट चौथ्या मजल्यावरून खाली कोसळली. मात्र या भीषण अपघातातून अजित पवार थोडक्यात बचावले, अशी माहिती त्यांनी स्वत:च दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) पुण्यात भयावहअपघातातून थोडक्यात बचावले आहेत. अजित पवार यांनी स्वत:च एका कार्यक्रमात या भीषण घटनेबाबतची माहिती दिली आहे. ही घटना काल (१४ जानेवारी) रोजी घडली होती.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

या अपघातात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. अजित पवार यांनी बारामतीत एका कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली.

अजित पवार म्हणाले की, शनिवारी मी रूग्णालयात गेलो होतो. त्यावेळी लिफ्टने वरती जात असताना अचानक लाईट गेली अन् लिफ्टमध्ये काही बिघाड झाला व लिफ्टसह आम्ही चौथ्या मजल्यावरून खाली कोसळलो. लिफ्ट धाडकन जमिनीवर आदळली. नशीब बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो नाहीतर आजच या ठिकाणी श्रद्धांजली कार्यक्रम घ्यावा लागला असता. काल दिवसभर हे मी कुणाला सांगितलं नाही. परंतु, आज तुम्ही माझ्या घरचे आहात म्हणून तुम्हाला सांगतो, असंही अजित म्हणाले.

अजित पवार म्हणाले की, माझ्यासोबत एक डॉक्टर आणि एक सुरक्षा रक्षक देखील लिफ्टमध्ये होते. या घटनेनंतर लिफ्टचा दरवाजा तोडून आम्हाला बाहेर काढण्यात आलं. काल माझ्या वडिलांची पुण्यतिथी होती. त्यामुळं घरात कोणालाच सांगितलं नाही. माध्यमांना देखील याबाबतची माहिती मी दिली नाही. कारण कालच आमची ब्रेकिंग न्यूज झाली असती.

 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या