मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Electricity Price : साडेसात लाख मुंबईकरांना स्वस्तात वीज मिळणार; वीज कंपन्यांच्या बैठकीत मोठा निर्णय

Mumbai Electricity Price : साडेसात लाख मुंबईकरांना स्वस्तात वीज मिळणार; वीज कंपन्यांच्या बैठकीत मोठा निर्णय

Jul 15, 2023, 09:22 AM IST

    • mumbai electricity per unit rate : भर पावसाळ्यात महागाईच्या झळा बसत असतानाच आता मुंबईकरांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
electricity per unit rate in mumbai (HT)

mumbai electricity per unit rate : भर पावसाळ्यात महागाईच्या झळा बसत असतानाच आता मुंबईकरांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

    • mumbai electricity per unit rate : भर पावसाळ्यात महागाईच्या झळा बसत असतानाच आता मुंबईकरांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

electricity per unit rate in mumbai : टॉमॅटोसह भाजीपाल्यांच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याने गृहिणींचं आर्थिक बजेट कोलमडलं आहे. परंतु आता मुंबईतील गृहिणींना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुंबईसह ठाणे आणि उपगनरात वीज दरात मोठी कपात केली जाणार आहे. तसेच मुंबईकरांना नेहमीच स्वस्तात वीज विक्री करण्याचा निर्णय वीज वितरण कंपन्यांच्या पंचवार्षिक बैठकीत घेण्यात आला आहे. सध्याच्या वीजदरांना स्थगिती देण्याचा टाटा पॉवरचा प्रस्ताव अॅप्टेल स्वीकारला आहे. त्यामुळं मुंबईतील साडेसात लाख ग्राहकांना येत्या काही दिवसांतच स्वस्तात वीज मिळणार आहे. ऐन महागाईच्या काळात मुंबईकरांना स्वस्तात वीज मिळणार असल्याने सामान्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Maharashtra Heat Stroke Cases: महाराष्ट्रात ७४ दिवसांत २४१ जण उष्माघाताचे बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्युची नोंद

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

वीज कंपन्यांनी घेतलेल्या निर्णयामुळं मुंबईकरांना २०२०-२१ वर्षातील दरानेच वीज मिळणार आहे. गेल्या एप्रिल महिन्यातच वीज कंपन्यांनी नवे दर लागू केले होते. परंतु अनेकांनी नव्या दरांवर आक्षेप घेत दरनिश्चितीत महागडी असल्याचं म्हटलं होतं. तसेच टाटा पॉवरने वाढलेल्या दरपत्रकांवर स्थगिती आणण्यासाठी अॅप्टेलकडे याचिका दाखल केली होती. अॅप्टेलने टाटा पॉवरची याचिका मंजूर करत नवी दरवाढ स्थगित केली आहे. परिणामी ग्राहकांना येत्या काही दिवसांपासून १४ ते ३१ टक्क्यांनी कमी दरात वीज मिळणार आहे. स्वस्त वीज केवळ टाटा पॉवरच्याच ग्राहकांना मिळणार आहे.

तीन महिन्यांपूर्वी महावितरण, महापारेषण तसेच महानिर्मिती या सरकारी कंपन्यांनी वीज दरवाढीची घोषणा केली होती. तसेच टाटा पॉवर आणि अदानी पॉवर या खाजगी वीज कंपन्यांनीही वीजेचे दर मोठ्या प्रमाणात वाढवले होते. त्यावरून राजकीय वाद देखील पेटला होता. शहरी भागात आणि ग्रामीण भागातही वीजेचे दर वाढवण्यात आल्याने त्यावर अनेकांनी आक्षेप घेत दर कमी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता टाटा पॉवरने जून्या दरानेच वीज विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी मुंबईतील साडेसात लाख ग्राहकांना टाटा कंपनीच्या निर्णयाचा फायदा होणार आहे.

पुढील बातम्या