मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून २४ तास काम करणार - एकनाथ शिंदे

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून २४ तास काम करणार - एकनाथ शिंदे

Jul 10, 2022, 02:51 PM IST

  • आता राज्यातल्या जनतेच्या आपल्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्या अपेक्षांना आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणालेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (हिंदुस्तान टाइम्स)

आता राज्यातल्या जनतेच्या आपल्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्या अपेक्षांना आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणालेत.

  • आता राज्यातल्या जनतेच्या आपल्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्या अपेक्षांना आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणालेत.

राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीनिमित्त (Eknath Shinde On Ashadhi Ekadashi ) पंढरपुरात विठ्ठलाची पूजा केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी आयोजीत केलेल्या एका मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी नव्या सरकारच्या योजनांची माहिती आपल्या कार्यकर्त्यांना दिली. राज्यात युतीचं सरकार बनलं आहे. आता राज्यातल्या जनतेच्या आपल्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्या अपेक्षांना आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं एकनाथ शिंदे म्हणालेत. मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यावर एकनाथ शिंदे यांनी या मेळाव्याच्या निमित्तानं शक्तिप्रदर्शन केलं. मात्र मेळाव्यात बोलताना त्यांनी कोणावरही आरोप केले नाहीत. 

ट्रेंडिंग न्यूज

Beed Murder : बीड हादरले! कौटुंबिक वादातून उशिने तोंड दाबून पत्नीला संपवले, नंतर स्वत:ही केली आत्महत्या

Baramati Crime : धक्कादायक! बारामतीत जोडप्याला लुटून नग्न केले; नको त्या अवस्थेत फोटो काढले

Unseasonal Rain : राज्यात अवकाळी पावसाचा कहर! २४ तासात वीज कोसळल्यामुळे ५ ठार; साताऱ्यात ईव्ही दुचाकीवर कोसळली वीज

Maharashtra Weather Update : चौथ्या टप्प्यातील मतदानावर अवकाळी पावसाचे सावट! 'या' मतदार संघात मुसळधार पावसाचा इशारा

राज्य सरकारच्या योजना कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात जनतेपर्यंत नेण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मी चोविस तास काम करुन सरकारची प्रतिमा बदलणार असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. मी जरी मुख्यमंत्री असलो तरी मी जनतेचा सेवक म्हणूनच काम करत राहाणार असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर हा त्यांचा राज्यातील पहिलाच मेळावा होता. (CM Eknath Shinde speech in Pandharpur)

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

राज्य सरकारच्या योजना कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात जनतेपर्यंत नेण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे. मी चोविस तास काम करुन सरकारची प्रतिमा बदलणार आहे. महाराष्ट्र राज्याचा विकासदर खूप चांगला आहे. आपल्याकडे गुणवत्ता आहे. महाराष्ट्रातील माणसू जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात काम करतोय. या सगळ्यांचा वापर आपण महाराष्ट्राच्या विकासासाठी करून घेतला पाहिजे,गतिमान सरकार आणि गतिमान प्रशासन ही आपल्या रथाची दोन चाकं आहेत. ही चाकं एकाच वेगाने धावली तर राज्याचा विकास होऊ शकतो असं एकनाथ शिंदे यांनी मेळाव्यात उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांना सांगितले.

मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा पार पडली आहे. राज्यातील शेतकरी, वारकरी, कष्टकरी, समाजातील सर्व घटकांना सुखाचं आनंदाचं समृद्धीचं जावो, कोविड संकट कायमस्वरुपी जावं. राज्यावरील संकटं, सगळ्या अडचणी दूर होवो. राज्यातील बळीराजा, कष्टकरी, समाजातील प्रत्येक घटकांना सुख समृद्धी मिळो. राज्याची प्रगती व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा. गोरगरीब सामान्यांच्या जीवनात चांगले दिवस यावेत, यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न असेल, असं मनोगत एकनाथ शिंदे यांनी महापूजेनंतर व्यक्त केलं. 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या