मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  एकनाथ शिंदेचे नाराजीनाट्य, अजित पवार कुठे आहेत?

एकनाथ शिंदेचे नाराजीनाट्य, अजित पवार कुठे आहेत?

Jun 21, 2022, 02:35 PM IST

    • विधान परिषद निवडणुकीनंतर नॉट रिचेबल झालेले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे सध्या गुजरातमध्ये आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार

विधान परिषद निवडणुकीनंतर नॉट रिचेबल झालेले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे सध्या गुजरातमध्ये आहेत.

    • विधान परिषद निवडणुकीनंतर नॉट रिचेबल झालेले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे सध्या गुजरातमध्ये आहेत.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीवर (Maha Vikas Aghadi) मोठं संकट ओढावलं आहे. शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नॉट रिचेबल झाले आहेत. त्यांच्यासह अनेक आमदार नॉट रिचेबल असल्यानं राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता निर्माण झाली आहे. विधान परिषदेच्या निकालानंतर (Vidhan Parishad Result) राज्यात नाराजीनाट्याची सुरुवाती झाली आहे. दरम्यान, या सर्व गोंधळात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे त्यांच्या नियोजित कामात व्यस्त आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Pune yerwada Crime : मुलगा झाला सैतान! दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने लाकडी दांडक्याने मारहाण करून आईचा खून

Maharashtra Weather Update : मुंबईकरांचा निघणार घाम! तर पुणे, कोल्हापूरसह राज्यात अवकाळी पावसाचे पुढील तीन दिवस धुमशान

Mumbai dry day 2024: ‘या’ तीन दिवशी दारू विक्रीवर बंदी! मुंबईतील सर्व वाईन शॉप, बीअर बार राहणार बंद

Gondia : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी; शिक्षक आणि मुख्याध्यापकांमधील वाद सोडवायला गेलेल्या लिपिकाचा मृत्यू

उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयात आहेत. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात नियमित कामकाजाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विटरवरून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत बोलताना एकनाथ शिंदेंबाबतचा प्रश्न हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचं म्हटलं आहे.

शरद पवार सध्या दिल्लीत असून राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बैठकीचे आय़ोजन करण्यात आले आहे. त्यासाठी शरद पवार दिल्लीत असून ती बैठक पार पडल्यानंतर आपण मुंबईला परतणार असल्याचं त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदेंबाबत शिवसेनेकडून जोपर्यंत निर्णय़ होत नाही तोपर्यंत आम्ही काही करणं योग्य नाही असंही पवारांनी स्पष्ट केलं आहे.

राज्यात राजकीय उलथापालथ होत असताना अजित पवार मात्र त्यांची नियोजित कामे करत असताना दिसत आहे. दुसऱ्या बाजुला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सध्या तरी महाविकास आघाडीला धोका नसल्याचं म्हटलं आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ शिंदेंकडून ऑफर आल्यास स्वीकारणार असल्याचे संकेत देण्यात आली आहेत.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या