मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मरण आलं तरी बेहत्तर पण दाऊदशी संबंध असणाऱ्यांशी.. एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

मरण आलं तरी बेहत्तर पण दाऊदशी संबंध असणाऱ्यांशी.. एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

Jun 26, 2022, 11:00 PM IST

    • एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. ट्विट करत त्यांनी थेट ठाकरेंवर टीका केली आहे.
एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. ट्विट करत त्यांनी थेट ठाकरेंवर टीका केली आहे.

    • एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. ट्विट करत त्यांनी थेट ठाकरेंवर टीका केली आहे.

मुंबई - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. ट्विट करत त्यांनी थेट ठाकरेंवर टीका केली आहे. टीका करताना त्यांनी दाऊद आणि मुंबई बॉम्बस्फोटाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंच्या निर्णयावर घणाघात केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Konkankanya express : कोकणात जाणाऱ्या गाड्यांमध्ये तुफान गर्दी; ‘कोकणकन्ये’तून पडून तरुणाचा मृत्यू

Mumbai Goa Highway Traffic Jam: सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-गोवा मार्गावर ट्रॅफिक जाम; वाहनांच्या अनेक किमी लांबच लांब रांगा

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळची घट मांडणी; पावसापासून शेतीपर्यंत केले महत्वाचे भाकीत; वाचा

Mumbai Crime : नाश्ता बनवला नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात मारला हातोडा; कुर्ला येथील धक्कादायक घटना

'मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…?यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल;आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर..

'हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर....तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू...'असं ट्विट त्यांनी केलं आहे.शिंदे यांनी ट्वीट करत संजय राऊत यांनाही टॅग केलं आहे. तसेच त्यांनी या ट्विटसह #MiShivsainik हे हॅशटॅग ही जोडले आहे.

राऊत यांना शिंदेंचे प्रत्युत्तर -

दहिसर येथील शिवसेनेच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना संजय राऊत म्हणजे होते की, ''४० आमदारांचे मृतदेह थेट गुवाहाटीमधून येतील. त्यांना थेट शवागृहात पोस्टमोर्टमसाठी पाठवू. गुवाहाटीमध्ये एक मंदिर आहे. या मंदिरात रेड्याचा बळी दिला जातो. आम्ही ४० रेडे पाठवले आहेत.'' राऊत यांनी केलेल्या याच वादग्रस्त वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केलं आहे.

शिंदे यांनी एकामागून एक असे दोन ट्वीट केलं आहे. आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये ते म्हणाले आहेत की, हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर. तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू, असं ते ट्वीट करून म्हणाले आहेत.

पुढील बातम्या