मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dasara Melava: न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावला जातोय, दीपक केसरकरांची प्रतिक्रिया

Dasara Melava: न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावला जातोय, दीपक केसरकरांची प्रतिक्रिया

Sep 23, 2022, 10:45 PM IST

    • केसरकर (Deepak kesarkar)  म्हणाले की, हा निकाल म्हणजे शिवसेना कुणाची हे भासवण्याचा प्रयत्न केला जातोय. उद्धव ठाकरे गटाचा विजय झाल्याचा चुकीचा अर्थ यातून काढण्यात येत आहे. 
दीपक केसरकर

केसरकर (Deepak kesarkar) म्हणाले की,हा निकाल म्हणजे शिवसेना कुणाची हेभासवण्याचा प्रयत्न केला जातोय. उद्धव ठाकरे गटाचा विजय झाल्याचाचुकीचा अर्थ यातून काढण्यात येत आहे.

    • केसरकर (Deepak kesarkar)  म्हणाले की, हा निकाल म्हणजे शिवसेना कुणाची हे भासवण्याचा प्रयत्न केला जातोय. उद्धव ठाकरे गटाचा विजय झाल्याचा चुकीचा अर्थ यातून काढण्यात येत आहे. 

Deepak kesarkar on dasara melava: दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मिळणार का, तसेच मिळाले तर कुणाला मिळणार याबाबतचे अंदाज वर्तवले जात असताना आज मुंबई उच्च न्यायालयाने याला पूर्णविराम दिला. उच्च न्यायालयाने दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला मैदान उपलब्ध करून दिले आहे. यावर शिंदे गटातील नेते व राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरवर (Deepak kesarkar) यांनी प्रतिक्रिया दिला आहे. मुंबईतील दसरा मेळाव्याबाबत हायकोर्टाने (mumbai high court) दिलेल्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावला जातोय, असे केसरकर म्हणाले आहेत. पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केसरकर बोलत होते.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai dry day 2024: ‘या’ तीन दिवशी दारू विक्रीवर बंदी! मुंबईतील सर्व वाईन शॉप, बीअर बार राहणार बंद

Gondia : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी; शिक्षक आणि मुख्याध्यापकांमधील वाद सोडवायला गेलेल्या लिपिकाचा मृत्यू

Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला राजस्थानमधून अटक

मुंबईतील बोरिवली इथं २१ मे पासून वसंत व्याख्यानमाला; अभ्यासकांसाठी बौद्धिक मेजवानी

दसरा मेळाव्यासाठी यंदा प्रथमच शिवसेनेतील दोन गट आमने-सामने होते.  त्यामुळे शिवाजी पार्कवर यंदा नेमका कुणाचा दसरा मेळावा होणार यावरुन तर्क-वितर्क लढवले जात होते. दरम्यान या सर्वचर्चांना मुंबई उच्च न्यायालयाने पूर्णविराम देत शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे गटाला मेळावा घेण्याची परवानगी दिली. मात्र हे प्रकरण येथेच संपले नसून यात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. मैदान ठाकरे गटाला देण्याच्या निर्णयाविरुद्ध शिंदे गट सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्यापर्यंत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे.

यावर केसरकर म्हणाले की, हा निकाल म्हणजे शिवसेना कुणाची हे भासवण्याचा प्रयत्न केला जातोय. उद्धव ठाकरे गटाचा विजय झाल्याचाचुकीचा अर्थ यातून काढण्यात येत आहे.मात्र न्यायालयाच्या निर्णयाने जे विजयाचा जल्लोष करत आहेत. त्यांनी एक लक्षात ठेवावे की, बाळासाहेबांचे विचार आहे तेथेच लोक येतात आणि मुंबईत  बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळावा घेतील तेव्हा याचा प्रत्यय येईल.

 

शिवसेना कुणाची यावर सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे.  त्या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्याबाबतच्या हायकोर्टाच्या आदेशाचा आधार घेऊन चुकीची माहिती पसरविली जात आहे. आम्ही दसरा मेळावा घेणार असलेले बीकेसी मैदान दादर येथील शिवाजी पार्कपेक्षा तीन पटींनी मोठे आहे. जेव्हा ते पूर्ण क्षमतेने भरेल तेव्हा समजेल की जनतेला कुणाचा विचार एकायचा आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्याचे की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, असे केसरकर म्हणाले.

पुढील बातम्या