मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Namo Yojana : सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळीची भेट; 'नमो शेतकरी’ योजनेच्या पहिल्या हप्त्यास मंजुरी

Namo Yojana : सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळीची भेट; 'नमो शेतकरी’ योजनेच्या पहिल्या हप्त्यास मंजुरी

Oct 10, 2023, 04:11 PM IST

  • Namo Shetkari Mahasanman Yojana : नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या पहिल्या हफ्त्यास सरकारने मंजुरी दिली आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा मोठा ऐतिहासिक निर्णय आहे.

Namo Shetkari Mahasanman Yojana

Namo Shetkari Mahasanman Yojana : नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या पहिल्या हफ्त्यास सरकारने मंजुरी दिली आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा मोठा ऐतिहासिक निर्णय आहे.

  • Namo Shetkari Mahasanman Yojana : नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या पहिल्या हफ्त्यास सरकारने मंजुरी दिली आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा मोठा ऐतिहासिक निर्णय आहे.

राज्यातील शिंदे फडणवीस सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांना मोठी खुशखबर दिली आहे. दसऱ्याच्या आधीच शेतकऱ्यांना शिंदे सरकाने दिवाळी गिफ्ट दिलं आहे. केंद्र सरकारच्या शेतकरी महासन्मान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या पहिल्या हफ्त्यास सरकारने मंजुरी दिली आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा मोठा ऐतिहासिक निर्णय आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai dry day 2024: ‘या’ तीन दिवशी दारू विक्रीवर बंदी! मुंबईतील सर्व वाईन शॉप, बीअर बार राहणार बंद

Gondia : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी; शिक्षक आणि मुख्याध्यापकांमधील वाद सोडवायला गेलेल्या लिपिकाचा मृत्यू

Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला राजस्थानमधून अटक

मुंबईतील बोरिवली इथं २१ मे पासून वसंत व्याख्यानमाला; अभ्यासकांसाठी बौद्धिक मेजवानी

राज्य सरकारने नमो योजनेच्या पहिल्या हफ्त्यास मंजुरी देत १ हजार ७२० कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे. राज्य सरकाच्या या महत्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्याला राज्य सरकारकडून वर्षाकाठी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.

शिंदे सरकारने आज नमो योजनेच्या पहिल्या हफ्त्यास मंजुरी दिली असून एप्रिल ते जुलै २०२३ या कालावधीतील पहिला हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. शेतकऱ्यांना आता नमो आणि पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र व राज्य सरकारचे मिळून वर्षाला एकूण १२ हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ संकल्प मांडताना घोषणा केली होती. पहिल्या हफ्त्यांतर्गत दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २ हजार रुपये जमा होणार आहेत.

आजच्या मंत्रिमंडळ बैठक निर्णय -

  • राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना. मुलींना करणार लखपती. ( महिला व बालविकास)
  •  सार्वजनिक खासगी भागीदारीतून उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी धोरण. मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक जलविद्युतमध्ये येणार. ( जलसंपदा विभाग)

● सांगली, अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये (विधि व न्याय विभाग)

● पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना १ एकरापेक्षा कमी जमीन मिळणार. (महसूल विभाग)

  • फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करणार. ( परिवहन विभाग) 
  • भोसला मिलिटरी स्कूलला नागपूर येथे जमीन. ( महसूल व वन विभाग)
  • विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर बदल करण्यास मान्यता. ( उच्च व तंत्र शिक्षण)

पुढील बातम्या