मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ganeshotsav 2023 : मुख्यमंत्र्यांचं गणेशभक्तांना मोठं गिफ्ट, गणेश मंडळांना मंडपशुल्क माफ

Ganeshotsav 2023 : मुख्यमंत्र्यांचं गणेशभक्तांना मोठं गिफ्ट, गणेश मंडळांना मंडपशुल्क माफ

Aug 29, 2023, 08:53 AM IST

    • Ganeshotsav 2023 Updates : अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येवून ठेपलेला असतानाच आता राज्यातील गणेश मंडळांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
Ganeshotsav 2023 Mumbai Maharashtra (HT)

Ganeshotsav 2023 Updates : अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येवून ठेपलेला असतानाच आता राज्यातील गणेश मंडळांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

    • Ganeshotsav 2023 Updates : अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येवून ठेपलेला असतानाच आता राज्यातील गणेश मंडळांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

Ganeshotsav 2023 Mumbai Maharashtra : येत्या १९ सप्टेंबर पासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यासाठी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये जोरदार तयारी सुरू करण्यात आलेली आहे. मुंबई महापालिका तसेच राज्य सरकारकडून गणेश मंडळांना नियमांमध्ये सूट देण्याची तसेच तीन ते पाच दिवस रात्री उशिरापर्यंत लाउडस्पीकरची परवानगी देण्यात येत आहे. त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशभक्तांना मोठं गिफ्ट दिलं आहे. नवी मुंबईतील सर्व गणेश मंडळांना अनामत शूल्क आणि मंडपशुल्क माफ माफ करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेला केल्या आहे. त्यामुळं गणेशभक्तांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहे. मंडप शूल्क आणि अनामत रक्कम गणेश मंडळांकडून घेतली जाणार नाही. त्यामुळं गणेश मंडळांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. नवी मुंबईत मंडप तसेच अन्य परवानग्यांसाठी गणेश मंडळांकडून महापालिकेकडे ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पालिकेने गणेश मंडळांना परवानगी शूल्कही माफ केलं आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवस अगोदर पर्यंत म्हणजेच ९ सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू राहणार असल्याचं महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

मंडप उभारणी आणि अनामत रक्कम शूल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळं गणेश मंडळांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेने एकाच अर्जाद्वारे गणेश मंडळांना सर्व परवानग्या देण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद या प्रमुख शहरांमध्ये गणेशोत्सवाची जोरदार तयारी करण्यात येत आहे. गणेश मंडळांकडून सध्या वेगवेगळ्या परवानग्यांसाठी प्रशासनाकडे अर्ज करण्यात येत आहे. दुसरीकडे पोलीस व सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेण्यात येत आहे. याशिवाय गणेश विसर्जनासाठी तलाव, नदी, समुद्र आणि कृतिम तलावांच्या ठिकाणी आवश्यक व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील गणेश मंडळांना मंडपशूल्क तसेच अनामत रक्कम शूल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुढील बातम्या