मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pohradevi : पोहरादेवी व बंजारा समाजासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या तीन मोठ्या घोषणा; म्हणाले..

Pohradevi : पोहरादेवी व बंजारा समाजासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या तीन मोठ्या घोषणा; म्हणाले..

Feb 12, 2023, 04:56 PM IST

  • Eknath shinde on pohradevi sansthan : बंजारा समाज व या समाजाचे श्रद्धास्थान पोहरादेवी संस्थानसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत बंजारा भवन उभारण्याबरोबरच अन्य काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.

बंजारा समाजासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या तीन मोठ्या घोषणा

Eknath shinde on pohradevi sansthan : बंजारा समाज व या समाजाचे श्रद्धास्थान पोहरादेवी संस्थानसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत बंजारा भवन उभारण्याबरोबरच अन्य काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.

  • Eknath shinde on pohradevi sansthan : बंजारा समाज व या समाजाचे श्रद्धास्थान पोहरादेवी संस्थानसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत बंजारा भवन उभारण्याबरोबरच अन्य काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.

वाशिम - (जिमाका) - बंजारा समाजाच्या पोहरादेवी देवस्थान येथे आज समाजाच्या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बंजारा समाजाचे नेते मंत्री संजय राठोड यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

ट्रेंडिंग न्यूज

Parbhani News : परभणी हादरली! तू माझ्या पत्नीसारखीच म्हणत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज हेलिकॉप्टरने पोहरादेवी येथे हेलिपॅडवर आगमन होताच, त्यांनी सर्वप्रथम माता जगदंबा देवी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री संजय राठोड, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार निलय नाईक, बंजारा समाजाचे धर्मगुरु महंत बाबूसिंग महाराज, महंत कबिरदास महाराज, शेखर महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.

एकनाथ शिंदे यांनी बंजारा भाषेतून आपल्या भाषणाला सुरुवात केली. पोहरादेवी सेवाध्वजाचं लोकार्पण व संत सेवालाल महाराज पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बंजारा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मंत्री संजय राठोड नेहमी धडपडत असतात. त्यांना हवी ती मदत केली जाईल. पोहरादेवी संस्थान विकासासाठी ५९३ कोटी रुपयांची निधी मंजूर केल्याचं त्यांनी सांगितलं. शिंदे म्हणाले की, वसंतराव नाईक महामंडळाला कधीही निधी कमी पडू देणार नाही. ५० कोटी रुपये बंजारा महामंडळाला देणार असल्याचं तसेच नवी मुंबई येथे बंजारा भवन उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या