मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Advertisement Row : जाहिरातीवरुन वाद पेटला! शिंदे गटाच्या आमदाराने थेट भाजपची औकात काढली, बच्चू कडू अन् गोगावलेही भडकले

Advertisement Row : जाहिरातीवरुन वाद पेटला! शिंदे गटाच्या आमदाराने थेट भाजपची औकात काढली, बच्चू कडू अन् गोगावलेही भडकले

Jun 14, 2023, 08:07 PM IST

  • Eknath shinde advertisement row : शिंदे गटाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली सर्व्हेची जाहिरात भाजपला चांगलीच जिव्हारी लागल्याचं दिसत आहे. भाजप खासदाराने शिंदे गटावर कडाडून टीका केल्यानंतर आता  शिंदे गटाच्या आमदाराने थेट भाजपची औकात काढली आहे.

Eknath shinde advertisement 

Eknathshindeadvertisementrow : शिंदे गटाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली सर्व्हेची जाहिरात भाजपला चांगलीच जिव्हारी लागल्याचं दिसत आहे. भाजप खासदाराने शिंदे गटावर कडाडून टीका केल्यानंतर आता शिंदे गटाच्या आमदाराने थेट भाजपची औकात काढली आहे.

  • Eknath shinde advertisement row : शिंदे गटाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली सर्व्हेची जाहिरात भाजपला चांगलीच जिव्हारी लागल्याचं दिसत आहे. भाजप खासदाराने शिंदे गटावर कडाडून टीका केल्यानंतर आता  शिंदे गटाच्या आमदाराने थेट भाजपची औकात काढली आहे.

राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारचे पुढील आठवड्यात वर्षपूर्ती होत आहे. मात्र त्याआधीच जाहिरातींवरून शिंदे गट आणि भाजप यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. सर्व्हेच्या जाहिरातीवरुन झालेला हा वाद मिटवण्यासाठी व डॅमेज कंट्रोलसाठी शिंदेंच्या शिवसेनेनं पुन्हा नवी जाहिरात दिली. आजच्या जाहिरातीत फोटोंपासून टक्केवारीपर्यंत सर्वंचं नव्यानं छापण्यात आल. मात्र सर्व्हेची जाहिरात भाजपला चांगलीच जिव्हारी लागल्याचं दिसत आहे. भाजप खासदाराने शिंदे गटावर कडाडून टीका केल्यानंतर आता शिंदे गटाच्या आमदाराने थेट भाजपची औकात काढली आहे. तर, शिंदे गटासोबत असलेले अपक्ष आमदार बच्चू कडू व प्रवक्ते भरत गोगावलेही चांगलेच भडकले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

भाजपकडून शिंदेंवर विखारी टीका -

भाजप खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका केली. बेडूक कितीही फुगला तरी तो हत्ती होत नाही, असा टोला बोडेंनी लगावला आहे. तसेच शिंदे ठाण्याला महाराष्ट्र समजत असल्याचे टोलाही बोंडे यांनी लगावला आहे. यानंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांनी थेट भाजपची औकात काढत पलटवार केला आहे. आमदार बच्चू कडू यांनीही या टीकेला उत्तर दिले आहे.

शिंदे साहेबांशिवाय तुम्ही फुगले नसते – बच्चू कडू

शिंदे गटाचे सहयोगी अपक्ष आमदार बच्चू कडू म्हणाले की, बोंडे अशी टीका करत असेल तर दुर्दैव आहे. बेडूक कोण आहे हे येणाऱ्या काळात समजेल तसेच बोंडेच्या या वक्तव्याचा निषेध करतो. याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. तुम्ही शिंदे साहेबांना बेडूक म्हणत असाल तर तुम्ही शिंदे साहेबांशीवाय फुगले नसते वेळ आल्यानंतर बोंडेना योग्य उत्तर देऊ, असे बच्चू कडू म्हणाले.

बेडूक फुगतो की सुजतो हे नंतर कळेल– गोगावले

अनिल बोंडेंच्या विखारी टीकेबद्दल विचारलं असता शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले म्हणाले की, माझी उपमुख्यमंत्र्यांबरोबर याबद्दल चर्चा झाली आहे. त्यांनी तिथूनच त्या लोकांना फोन करून काय सांगायचं ते सांगितलंय. त्यामुळे आता आम्ही त्या खोलात शिरत नाही. वरच्या स्तरावर याचा विचार केला जाईल. बेडूक फुगतो की सुजतो हे नंतर कळेल.

भाजपाची काय औकात होती? – संजय गायकवाड

अनिल बोंडेंच्या टीकेला उत्तर देतानाशिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणाले, “शिवसेना आणि एकनाथ शिंदे वाघ आहेत. या ५० वाघांमुळेच भाजपच्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. एखाद्या मुख्यमंत्र्यांचं काम जनतेला पटत असेल आणि जनता कौतुक करत असेल, तर ते पचवायची ताकद राजकीय नेत्यांमध्ये असायला हवी. एकनाथ शिंदे राज्यात काम करत आहेत. त्यांना बेडकाची उपमा देणं किंवा ते ठाण्यापुरते मर्यादित आहेत, असं म्हणणं चुकीचं आहे.

 

पूर्वी तुम्ही (भाजपा) किती मर्यादित होता, कुणाच्या संगतीने तुम्ही महाराष्ट्रात मोठे झालात? याचा विचार केला पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंचं बोट पकडून तुम्ही महाराष्ट्रात  मोठे झाला आहात, बाळासाहेब ठाकरे नसते तर महाराष्ट्रात तुमची काय औकात होती? हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे.

पुढील बातम्या