मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath khadse : विनोद तावडेंच्या ऑफरनंतर पुन्हा भाजपमध्ये जाणार का? खडसेंनी एका वाक्यात विषय संपवला

Eknath khadse : विनोद तावडेंच्या ऑफरनंतर पुन्हा भाजपमध्ये जाणार का? खडसेंनी एका वाक्यात विषय संपवला

Jun 05, 2023, 07:05 PM IST

  • Eknath khadses on vinod tawdes offer :विनोद तावडे यांच्या भाजपमध्ये परत येण्याच्या आमंत्रणावर राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडेस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ खडसे

Eknath khadses on vinod tawdes offer :विनोद तावडे यांच्या भाजपमध्ये परत येण्याच्या आमंत्रणावर राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडेस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • Eknath khadses on vinod tawdes offer :विनोद तावडे यांच्या भाजपमध्ये परत येण्याच्या आमंत्रणावर राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडेस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जळगाव - भाजपचे नेते विनोद तावडे यांनी एकनाथ खडसे यांना पुन्हा भाजपात येण्याचं निमंत्रण देत भावनिक साद घातली आहे. नाथाभाऊ तुम्ही परत भाजपात या, असं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता विनोद तावडे यांच्या या पक्षात येण्याच्या आमंत्रणावर राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Jayant patil : “लढाई संपलेली नाही, तर आता..’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

Mumbai-Pune Trains: मुंबई ते पुणे गाड्या रद्द, २८ मे ते २ जूनपर्यंत 'या' गाड्या धावणार नाहीत, वाचा संपूर्ण यादी

Mumbai Lok Sabha : वरळीत पोलिंग बूथवर काम करणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू

Bhiwandi Accident: भिवंडीत कारच्या धडकेत ५२ वर्षीय कामगाराचा मृत्यू, चालकाविरोधात गुन्हा दाखल

एकनाथ खडसे म्हणाले की, विनोद तावडे आणि मी गेली अनेक वर्षे भारतीय जनता पार्टीचे काम करत होतो.भाजपच्या विस्तारामध्ये आणि पक्ष तळागाळात पोहोचवण्यामध्ये विनोद तावडे यांचे खूप मोठं योगदान राहिले आहे. मात्र अलीकडची परिस्थिती पाहिली तर त्यांना वाटत असावे की, जुन्या लोकांनी परत एकत्र येऊन पक्ष वाढीसाठी काम करावं, यामुळे निवडणुका जिंकण्यास मदत होऊ शकेल, कर्नाटकच्या निकालाचे चित्र एकंदरीत पाहून जुन्या नेत्यांना एकत्रित आणण्याचे विनोदयांचे प्रयत्न असावेत, असे म्हणत एकनाथ खडसेंनी विनोद तावडे आणि त्यांच्या मैत्रीचा उल्लेख केला. त्याचबरोबर खडसे म्हणाले की, मी कुठल्याही परिस्थितीत भाजपात परत जाणार नाही.

खडसे म्हणाले की, ज्या पक्षासाठी इतकं केले, त्या पक्षाने मला वाऱ्यावर सोडलं. २०१४ पासून माझा ज्या पक्षात छळ झाला. अनेक चौकशा लावण्यात आल्या त्या पक्षात आता मी पुन्हा जाणार नाही. भाजपमध्ये ज्यांच्यावर मोठे मोठे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते पक्षात येऊन स्वच्छ झाले. अडचणीच्या काळात शरद पवार यांनी मला विधानपरिषदचं सदस्य बनवून राजकीय विजनवासातून बाहेर काढले. त्यामुळे भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

पंकजा मुंडे यांच्याबद्दल खडसे म्हणाले की, पंकजा अस्वस्थ आहेत ही गोष्ट खरी आहे, पंकजा यांचा पराभव झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना सन्मानाचे स्थान कुठेही देण्यात आले नाही. अनेकांना निवडणुकीत उभा न करता विधान परिषदेचे सदस्यत्व दिले गेले, काहींची वेगवेगळ्या पदावर नियुक्तीही करण्यात आली. मात्र, पंकजा मुंडेंचा विचार कुठेही केला नाही, सातत्याने पंकजा मुंडेंवर अन्याय झाल्याची भावना त्यांच्या मनात आहे, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडेंना भाजपने डावलल्याचा आरोप केला आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या