मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Farmer Suicide: बळीराजाचा जीवनाशी संघर्ष; ९ महिन्यांत ७५६ शेतकऱ्यांनी संपवले जीवन

Farmer Suicide: बळीराजाचा जीवनाशी संघर्ष; ९ महिन्यांत ७५६ शेतकऱ्यांनी संपवले जीवन

Oct 11, 2022, 12:38 PM IST

    • Farmer Suicide : राज्यात सत्ता संघर्ष सुरू आहे. सत्तेसाठी शिवसेनेत फुट पडली आणि आता पुन्हा पक्षाच्या मालकी हक्कावरून वादावादी सुरू आहे. या सत्ता संघर्षात एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण देखील सुरू आहे. मात्र, या सत्ता संघर्षात मात्र, सर्वांना जागाचा पोशिंदा असलेल्या बळिराजाचा विसर पडलेला दिसतोय. गेल्या ९ महिन्यात मराठवाड्यात तब्बल ७५६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Farmer Suicide : राज्यात सत्ता संघर्ष सुरू आहे. सत्तेसाठी शिवसेनेत फुट पडली आणि आता पुन्हा पक्षाच्या मालकी हक्कावरून वादावादी सुरू आहे. या सत्ता संघर्षात एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण देखील सुरू आहे. मात्र, या सत्ता संघर्षात मात्र, सर्वांना जागाचा पोशिंदा असलेल्या बळिराजाचा विसर पडलेला दिसतोय. गेल्या ९ महिन्यात मराठवाड्यात तब्बल ७५६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

    • Farmer Suicide : राज्यात सत्ता संघर्ष सुरू आहे. सत्तेसाठी शिवसेनेत फुट पडली आणि आता पुन्हा पक्षाच्या मालकी हक्कावरून वादावादी सुरू आहे. या सत्ता संघर्षात एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण देखील सुरू आहे. मात्र, या सत्ता संघर्षात मात्र, सर्वांना जागाचा पोशिंदा असलेल्या बळिराजाचा विसर पडलेला दिसतोय. गेल्या ९ महिन्यात मराठवाड्यात तब्बल ७५६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

औरंगाबाद : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून सत्तेसाठी संघर्ष सुरू आहे. सर्व राजकीय पक्ष एकमेकांवर कुरघोड्या करत आहेत. सत्ता मिळावी यासाठी शिवसेनेतून फुटून निघून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण त्यांच्या सरकारचे मात्र, जगाचा पोशिंदा असलेल्या बळिराजाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झालेले दिसते. अतिवृष्टी आणि नापिकी मुळे अनेक शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. गेल्या ९ महिन्यात मराठवाड्यात ७५६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Goa Highway Traffic Jam: सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-गोवा मार्गावर ट्रॅफिक जाम; वाहनांच्या अनेक किमी लांबच लांब रांगा

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळची घट मांडणी; पावसापासून शेतीपर्यंत केले महत्वाचे भाकीत; वाचा

Mumbai Crime : नाश्ता बनवला नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात मारला हातोडा; कुर्ला येथील धक्कादायक घटना

Maharashtra Weather Update : राज्याला अवकाळी पावसाने झोडपले! पुणे, साताऱ्यात ऑरेंज तर उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट

या वर्षी झालेल्या पावसामुळे पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. मोठ्या मेहनतीने शेतीत काबाड कष्ट करून चांगल्या पिकाचे आशा शेतकऱ्यांनी केली होती. निसर्गाच्या लहरी पणामुळे त्यांच्या सर्व आशांवर पाणी फेरले आहे. यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या बळी राजा आणखी आर्थिक गर्तेत अडकत चालला आहे. त्यातूनच आत्महत्येचा मार्ग शेतकरी निवडत आहे. मराठवाड्यात गेल्या ९ महिन्यात ७५६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली यातील ४०० शेतकऱ्यांनी पावसाळ्यात पिकांचे नुकसान झाल्याने गळफास आणि विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतल्यावर २९२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

सरकारने आत्महत्या थांबवण्यासाठी अनेक घोषणा केल्या. मात्र, अद्यापही त्यांना मदत मिळत नसल्याने, शेतीकरी टोकाचे पावले उचलत आहेत. ज्या सप्टेंबर महिन्यात सत्तसंघर्षाचा उत आला होता, त्याच महिन्यात तब्बल मारठवड्यातील तब्बल ९० शेतकऱ्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली.

गेल्या १ जानेवारी ते ३० सप्टेंबर या काळात या आत्महत्या झालेल्या आहेत. जानेवारी महिन्यात ५९, फेब्रुवारी महिन्यात ७३, मार्च महिन्यात १०१, एप्रिल महिन्यात ४७, मे महिन्यात ७६, जून महिन्यात १०८, जुलै महिन्यात ८३, ऑगस्ट महिन्यात ११९, तर सप्टेंबर महिन्यात ९० असे एकूण ७५६ शेतरकऱ्यांनी आत्महत्या केली.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या