मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ratnagiri temple dress code : रत्नागिरीच्या मंदिरांना भेट देणार असाल तर ही बातमी वाचा; तब्बल ५० मंदिरात ड्रेसकोड लागू

ratnagiri temple dress code : रत्नागिरीच्या मंदिरांना भेट देणार असाल तर ही बातमी वाचा; तब्बल ५० मंदिरात ड्रेसकोड लागू

Nov 26, 2023, 11:30 AM IST

    • ratnagiri temple dress code : रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल ५० मंदिरांमद्धे ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. यामुळे आता जर तुम्ही येथील मंदिरात भेट देणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.
ratnagiri temple dress code

ratnagiri temple dress code : रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल ५० मंदिरांमद्धे ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. यामुळे आता जर तुम्ही येथील मंदिरात भेट देणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.

    • ratnagiri temple dress code : रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल ५० मंदिरांमद्धे ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. यामुळे आता जर तुम्ही येथील मंदिरात भेट देणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.

ratnagiri news : रत्नागिरी जिल्ह्यातील मंदिरांना जर तुम्ही भेट देण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला आता ड्रेस कोड पाळावा लागणार आहे. रत्नागिरीच्या तब्बल ५० मंदिरांमध्ये वस्त्र संहिता लागू करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात येणारे पर्यटक या मंदिरांना भेटी देत असतात. त्यामुळे आता त्यांना मंदिरातील कपडे परिधान करण्या संदर्भातले नियम पाळावे लागणार आहेत. मंदिरात येतांना अंगात पूर्ण कपडे असणे बंधनकारक राहणार आहे. तसेच अंग प्रदर्शन करणारे तोकडे कपडे घालण्यास मनाई करण्यात आली आहे. या प्रकारचे फलक देखील मंदीराबाहेर लावण्यात आले आहेत. महाराष्ट्र मंदिर महासंघाने याबाबतचे प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Marathi Board : मराठीत पाट्या लावण्याची मुदत संपली! मुंबई पालिका अॅक्शन मोडवर; तर मनसे करणार खळखट्याक

राज्यातील मंदिर, धार्मिक स्थळावर ड्रेस कोड लागू करण्याबाबत गेल्या काही दिवसांपासूंन चर्चा सुरू आहे. या वस्त्र संहीतेची काही ठिकाणी अमलबजावणी करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी अद्याप ती लागू करण्यात आलेली नाही. मंदिरांचे पावित्र्य, शिष्टाचार, संस्कृती जपण्यासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’तर्फे रत्नागिरी जिल्ह्यात ११ ठिकाणी बैठका घेण्यात आल्या होत्या. या बैठकांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ५० मंदिरांच्या विश्वस्तांनी त्या मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुरूप वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

26/11 Mumbai Terror Attack : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला १५ वर्ष पूर्ण; तरीही सागरी सुरक्षा ही अपुरिच

त्यानुसार रत्नागिरीतील तब्बल ५० मंदिरांत ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. कोकणात पर्यटनासाठी येणारे अनेक भाविक ही तोकड्या कपड्यांमध्ये दर्शन घेत होते. यामुळे मंदिरांच्या पवित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होता. यामुळे ही वस्त्र आचार संहिता लागू करण्यात आली आहे. दरम्यान, या पूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील या मंदिरांमध्ये ड्रेसकोड लागू

१. श्री नवलाई, पावणाई, जाकादेवी, महापुरुष देवस्थान मंदिर, नाचणे, ता. रत्नागिरी

२. श्री साई मंदिर, गोडाऊन स्टॉप, नाचणे, ता. रत्नागिरी

३. श्री विश्वेश्वर मंदिर, पिंपळवाडी, नाचणे, ता. रत्नागिरी

४. श्री नवलाई मंदिर, पिंपळवाडी, नाचणे, ता. रत्नागिरी

५. श्री ज्योतिबा मंदिर, पेठ किल्ला, रत्नागिरी

६. श्री स्वयंभू काशीविश्वेश्वर देवस्थान, राजिवडा, रत्नागिरी

७. श्री दत्त मंदिर खालची आळी, रत्नागिरी

८. श्री मारुती मंदिर संस्था ( दक्षिणाभिमुख मारुती मंदिर), मारुती मंदिर, रत्नागिरी

९‹. श्री साई मंदिर, मोडेवाडी, मिरजोळे, ता. रत्नागिरी

१०. श्रीकृष्ण मंदिर, श्री महापुरुष मंदिर, वरचीवाडी, मिरजोळे, ता. रत्नागिरी

११. श्री लक्ष्मीकांत मंदिर, लक्ष्मीकांत वाडी, मिरजोळे, ता. रत्नागिरी

१२. श्रीराम मंदिर, पावस, ता. रत्नागिरी

१३. श्री अंबा माता मंदिर, श्री मरुधर विष्णू समाज सभागृह, रत्नागिरी

१४. श्री विठ्ठल राम पंचायतन मंदिर, राजापूर

१५.श्री निनादेवी मंदिर, राजापूर,

१६. श्री कामादेवी मंदिर, राजापूर

१७. श्री लक्ष्मीनारायण मंदिर, गुजराळी, राजापूर

१८. श्री चव्हाटा मंदिर, जवाहर चौक, राजापूर

१९.श्री महाकाली मंदिर, आडिवरे, ता. राजापूर

२०. श्री कनकादित्य मंदिर, कशेळी, ता. राजापूर

२१. श्री सत्येश्वर मंदिर, कशेळी, ता. राजापूर

२२. श्री जाकादेवी मंदिर, कशेळी, ता. राजापूर

२३. श्री स्वामी समर्थ मठ, उन्हाळे, ता. राजापूर

२४. श्री गणेश मंदिर, मावळत वाडी, कालुस्ते, ता. चिपळूण

२५. श्री हनुमान मंदिर, कुंभार वाडी, भिले, ता. चिपळूण

२६. श्री देव सिध्देश्वर मंदिर (सिध्देश्वर प्रतिष्ठान), भिले, ता. चिपळूण

२७. श्री देव महादेव भानोबा कालेश्री देवस्थान भिले -धामेली ट्रस्ट, भिले-धामेली, ता. चिपळूण

२८. श्री लक्ष्मीकांत देवस्थान, गांग्रई, ता. चिपळूण

२९. श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, गांग्रई, ता. चिपळूण

३०. श्री दत्त मंदिर, दत्तवाडी, गांग्रई, ता. चिपळूण

३१. श्री खेम वाघजाई मंदिर, ग्रामदैवत, बिवली-करंबवणे, ता. चिपळूण

३२. श्री गणेश उत्कर्ष मंडळ, बांद्रेवाडी, मालदोली, ता. चिपळूण

३३. श्री देव जुना कालभैरव मंदिर, चिपळूण

३४. श्री विंध्यवासीनि मंदिर, रावतळे, चिपळूण

३५. श्री शिव मंदिर, चिपळूण

३६. श्री काळेश्री मंदिर, कान्हे, ता. चिपळूण

३७. श्री हनुमान मंदिर, पिंपळी, ता. चिपळूण

३८. श्री हनुमान मंदिर, पेढांबे, ता. चिपळूण

३९. श्री गणेश मंदिर, नांदिवसे, ता. चिपळूण

४०. श्री रामवरदायिनी मंदिर,दादर, ता. चिपळूण

४१. श्री मुरलीधर मंदिर, चिपळूण

४२. श्री रामवरदायिनी मंदिर देवस्थान ट्रस्ट, मजरे दादर(दसपटी ), ता. चिपळूण

४३.श्री चंडिका माता मंदिर, गणपतीपुळे, ता. रत्नागिरी

४४. श्री सोमेश्वर सुंकाई एन्डोमेंट ट्रस्ट, सडये, पिरंदवणे, ता. रत्नागिरी

४५. श्री परशुराम मंदिर, परटवणे, रत्नागिरी

४६. स्वयंभू श्री महालक्ष्मी देवस्थान न्यास, कारवांचीवाडी, रत्नागिरी

४७. श्री दुर्गादेवी देवस्थान, मुरुड, ता. दापोली

४८. श्री भार्गवराम देवस्थान, कोळबांद्रे, ता. दापोली

४९. श्री विमलेश्वर मंदिर, मुर्डी, ता. दापोली

५०. कड्यावरील श्री गणपती देवस्थान, आंजर्ले, ता. दापोली

५१ गणपती पंचायतन मंदिर केळेय रत्नागिरी

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या