मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Draupadi Murmu In Mumbai: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन, पाहा VIDEO

Draupadi Murmu In Mumbai: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन, पाहा VIDEO

Jul 06, 2023, 10:14 PM IST

  • Draupadi murmur Mumbai visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज प्रभादेवी येथील श्री सिध्दिविनायक गणपती मंदिराला भेट देवून श्री सिध्दिविनायकाचे दर्शन घेतले.

द्रौपदी मुर्मू यांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन

DraupadimurmurMumbai visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज प्रभादेवी येथील श्री सिध्दिविनायक गणपती मंदिराला भेट देवून श्री सिध्दिविनायकाचे दर्शन घेतले.

  • Draupadi murmur Mumbai visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज प्रभादेवी येथील श्री सिध्दिविनायक गणपती मंदिराला भेट देवून श्री सिध्दिविनायकाचे दर्शन घेतले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज प्रभादेवी येथील श्री सिध्दिविनायक गणपती मंदिराला भेट देवून श्री सिध्दिविनायकाचे दर्शन घेतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती म्हणून त्यांचा मुंबईतील पहिलाच दौरा आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pandharpur Darshan : भाविकांसाठी आनंदवार्ता! पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार सुरू

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

Pune Urulikanchan news : वीज कडाडल्याच्या आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

Malad Woman Found Dead: मालाडमध्ये राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

मुंबईत दाखल होताच आज त्यांनी सिध्दिविनायक गणपती मंदिरात दर्शन घेतले आणि श्रींची आरती केली. यावेळी राज्यपाल रमेश बैस, सिध्दिविनायक गणपती मंदिर न्यास समितीचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्यासह विश्वस्त, न्यास समितीच्या कार्यकारी अधिकारी नंदा राऊत, राष्ट्रपती कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.याप्रसंगी मंदिर न्यास समितीतर्फे गणपतीची मूर्ती भेट देऊन राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.

राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मू यांचे आज मुंबईमध्ये आगमन झाले. राज्याचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मुर्मू यांचे स्वागत केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्या नागपुरात दाखल झाल्या होत्या. गेल्या वर्षी जुलैमध्ये राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा पहिलाच महाराष्ट्र दौरा आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या