मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ambedkar memorial : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिलमधील स्मारक कधीपर्यंत होणार पूर्ण? नवी माहिती आली समोर

Ambedkar memorial : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिलमधील स्मारक कधीपर्यंत होणार पूर्ण? नवी माहिती आली समोर

Dec 04, 2023, 11:47 PM IST

  • Dr. Babasaheb Ambedkar Memorial : मुंबईतील इंदु मिल जमिनीवर उभारण्यात येत असलेल्या डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचे आतापर्यंत ३५ टक्के काम पूर्ण झाले आहे. हे स्मारक मे २०२६ पर्यंत पूर्ण होईल, असा दावा एमएमआरडीएने केला आहे.

Dr. Babasaheb Ambedkar Memorial

Dr. Babasaheb Ambedkar Memorial : मुंबईतील इंदु मिल जमिनीवर उभारण्यात येत असलेल्या डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचे आतापर्यंत ३५ टक्के काम पूर्ण झाले आहे. हे स्मारक मे २०२६ पर्यंत पूर्ण होईल,असा दावा एमएमआरडीएने केला आहे.

  • Dr. Babasaheb Ambedkar Memorial : मुंबईतील इंदु मिल जमिनीवर उभारण्यात येत असलेल्या डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचे आतापर्यंत ३५ टक्के काम पूर्ण झाले आहे. हे स्मारक मे २०२६ पर्यंत पूर्ण होईल, असा दावा एमएमआरडीएने केला आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक दादर येथील इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षापासून या स्मारकाचे काम रखडले आहे. मात्र आता हे स्मारक कधी पूर्ण होणार, याबाबत नवी माहिती समोर आली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) उभारत असलेल्या या स्मारकाचे आतापर्यंत ३५ टक्के काम पूर्ण झाले आहे. या स्मारकाचे काम मे २०२६ पर्यंत पूर्ण होईल, असा दावा एमएमआरडीएने केला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Manoj jarange patil : ..अन्यथा २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; जरांगेंनी विधानसभेचा फॉर्म्युलाच सांगितला

Pandharpur news : भाविकांसाठी आनंदवार्ता! पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार सुरू

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

Pune Urulikanchan news : वीज कडाडल्याच्या आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

दादरमधील इंदू मिलमधील ४.८४ हेक्टर जागेवर राज्य सरकारकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक बांधण्यात येत आहे. या स्मारकाची जबाबदारी एमएमआरडीएवर सोपविण्यात आली. २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र भूमीपूजनानंतर तीन वर्षांनी म्हणजे २०१८ मध्ये या स्मारकाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. काही कारणांमुळे कंत्राटदारास कार्यादेश देण्यास विलंब झाला. परिणामी, स्मारकाचे काम सुरू होण्यासही विलंब झाला. या स्मारकाचे काम २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. एमएमआरडीएने आता स्मारकाच्या कामाला वेग दिला. स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्याच्या कामालाही सुरुवात झाली आहे.

या स्मारकाचे आतापर्यंत ३५ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली. स्मारकातील बांधकाम ५२ टक्के, वाहनतळाचे ९५ टक्के, प्रवेशद्वाराचे ८० टक्के, सभागृहाचे ७० टक्के, ग्रंथालयाचे ७५ टक्के, प्रेक्षागृहाचे ५५ टक्के, स्मारक इमारतीचे ४५ टक्के असे काम पूर्ण झाले आहे. दरम्यान १०८९.९५ कोटी रुपये खर्चाच्या या स्मारकाचे काम २०२४ मध्ये पूर्ण होईल, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र पुतळ्याच्या कामास आता सुरूवात झाली असून ते पूर्ण होण्यास काहीसा काळ लागणार आहे. त्यामुळे हे स्मारक आता मे २०२६ मध्ये पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या