मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  BMC Shiv Sena Office : बीएमसीतील कार्यालयावर हक्क कोणाचा?; ठाकरे-शिंदे गटात मोठा राडा

BMC Shiv Sena Office : बीएमसीतील कार्यालयावर हक्क कोणाचा?; ठाकरे-शिंदे गटात मोठा राडा

Dec 29, 2022, 10:44 AM IST

    • ShivSena BMC Office : मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या कार्यालयावरून ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार राजकीय संघर्ष झाला असून नेत्यांनी सभागृहात एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्यानं वातावरण तापलं आहे.
ShivSena Office In BMC (HT)

ShivSena BMC Office : मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या कार्यालयावरून ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार राजकीय संघर्ष झाला असून नेत्यांनी सभागृहात एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्यानं वातावरण तापलं आहे.

    • ShivSena BMC Office : मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या कार्यालयावरून ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार राजकीय संघर्ष झाला असून नेत्यांनी सभागृहात एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्यानं वातावरण तापलं आहे.

ShivSena Office In BMC : मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आलेली असतानाच आता पालिकेतील कार्यालयावरून ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने आले आहेत. मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या कार्यालयावर ठाकरे आणि शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांनी दावा केला, त्यानंतर दोन्ही गटातील नेते आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्यानं पालिकेतील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं. पालिकेच्या सुरक्षारक्षकांना मध्यस्थी करत दोन्ही गटातील वाद मिटवला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव, शीतल म्हात्रे आणि नरेश म्हस्के या नेत्यांनी पालिकेत येऊन शिवसेनेच्या कार्यालयावर दावा ठोकला. त्यानंतर कार्यालयाबाहेरील बोर्ड बदलून ऑफिसमधील सभागृह गाठलं. त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच ठाकरे गटाचेही माजी नगरसेवक आणि नेते पालिकेत दाखल झाल्यानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. त्यानंतर प्रकरण हाताबाहेर जात असल्याचं लक्षात येताच पालिकेतील सुरक्षारक्षकांनी ऐनवेळी मध्यस्थी करत वाद मिटवला. त्यानंतर दोन्ही गटाचे नेते त्यांच्या पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.

मुंबई महापालिकेत कोणत्याही पक्षाचा नगरसेवक सध्या नसल्यानं शिवसेनेच्या कार्यालयात कुणालाही बसून न देण्याची मागणी महापालिकेच्या आयुक्तांकडे करणार असल्याचं वक्तव्य शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे आणि शिंदे गटात संसदेतील शिवसेनेच्या कार्यालयावरून वाद होत असतानाच आता मुंबई महापालिकेतही दोन्ही गटात ऑफिसवरून संघर्ष झाल्यामुळं त्याचे हिवाळी अधिवेशनात पडसाद उमटण्याची चिन्ह आहेत.

पुढील बातम्या