मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nitesh Rane : 'दिशा आणि सुशांतच्या मृत्यूचा विषय आला की आदित्य ठाकरे हेच नाव का येतं?'

Nitesh Rane : 'दिशा आणि सुशांतच्या मृत्यूचा विषय आला की आदित्य ठाकरे हेच नाव का येतं?'

Dec 22, 2022, 02:03 PM IST

  • Nitesh Rane on Disha Salian Case : दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूचा विषय निघाला की आदित्य ठाकरे हेच नाव का येतं,' असा सवाल भाजप आमदार नीतेश राणे यांनी केला आहे.

Sushant - Disha - Aaditya Thackeray

Nitesh Rane on Disha Salian Case : दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूचा विषय निघाला की आदित्य ठाकरे हेच नाव का येतं,' असा सवाल भाजप आमदार नीतेश राणे यांनी केला आहे.

  • Nitesh Rane on Disha Salian Case : दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूचा विषय निघाला की आदित्य ठाकरे हेच नाव का येतं,' असा सवाल भाजप आमदार नीतेश राणे यांनी केला आहे.

Nitesh Rane targets Aaditya Thackeray : एकनाथ शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता राज्यातही हे प्रकरण नव्यानं चर्चेत आलं आहे. भाजपचे खासदार नीतेश राणे यांनी या प्रकरणाची नव्यानं चौकशी करण्याची व आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूचा विषय निघाला की आदित्य ठाकरे हेच नाव का येतं,' असा सवालही त्यांनी केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

विधान भवनाच्या आवारात ते वृत्तवाहिन्यांशी बोलत होते. खासदार राहुल शेवाळे यांनी काल लोकसभेत दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला होता. दिशा सालियनला AU या नावानं ४४ कॉल करण्यात आले होते. हा AU म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असल्याचं ते म्हणाले होते. लोकसभा अध्यक्षांनी शेवाळे यांनी केलेला हा उल्लेख कामकाजातून काढून टाकला व गृहमंत्री अमित शहा यांनी देखील उत्तर देताना शेवाळे यांच्या आरोपची दखल घेतली नाही. मात्र, या प्रकरणावरून नीतेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे.

‘दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचा विषय आला की फक्त आदित्य ठाकरे यांचंच नाव का येतं? दुसऱ्या राजकारण्यांचं नाव का येत नाही? महाराष्ट्रात दुसरे राजकारणी नाहीत का? दाल में कुछ काला है... असं नीतेश राणे म्हणाले. ‘आतापर्यंत आम्ही सगळे याबद्दल बोलत आलो होतो. आता खुद्द राहुल शेवाळे यांनी हा विषय काढलाय. शेवाळे हे काही महिन्यांपूर्वीपर्यंत 'मातोश्री’च्या किचन कॅबिनेटमध्ये होते. स्थायी समितीचे अनेक वर्षे अध्यक्ष होते. ठाकरे कुटुंबीयांचे लाडके होते, याकडंही नीतेश यांनी लक्ष वेधलं.

‘दिशा आणि सुशांत प्रकरणात आदित्य ठाकरे यांची चौकशी झालीच पाहिजे. यापूर्वी आम्ही जी काही माहिती या प्रकरणासंदर्भात दिलीय, त्यापेक्षा महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळं आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करण्याची गरज आहे. श्रद्धा वालकरच्या केसमध्ये आफताबची नार्को झाली, त्यानंतर सत्य बाहेर आलं. त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट व्हायला हवी. 'ए' फॉर आफताब आणि ‘ए’ फॉर आदित्य. सगळ्या विकृतीचं नाव सेमच आहे. दिशा सालियनची केस आजही मुंबई पोलिसांकडं आहे. या प्रकरणाची फाइल पुन्हा उघडावी, अशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, असं नीतेश राणे म्हणाले.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या