मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Lumpy : लम्पी संदर्भातील उपाययोजनांमुळे पुणे जिल्ह्यात आजार नियंत्रणात; केवळ ८२७ जनावरे बाधित

Lumpy : लम्पी संदर्भातील उपाययोजनांमुळे पुणे जिल्ह्यात आजार नियंत्रणात; केवळ ८२७ जनावरे बाधित

Oct 16, 2022, 07:26 PM IST

    • Lumpy control in Pune District : पुण्यात लम्पी आजार आटोक्यात आला आहे. प्रशासनाने केलेल्या उपाय योजनामुळे आणि लासिकरणामुळे ही शक्य झाले आहे. सध्या जिल्ह्यात केळव ८२७ जनावरे ही या आजाराने बाधित आहेत.
Lumpy control in Pune District

Lumpy control in Pune District : पुण्यात लम्पी आजार आटोक्यात आला आहे. प्रशासनाने केलेल्या उपाय योजनामुळे आणि लासिकरणामुळे ही शक्य झाले आहे. सध्या जिल्ह्यात केळव ८२७ जनावरे ही या आजाराने बाधित आहेत.

    • Lumpy control in Pune District : पुण्यात लम्पी आजार आटोक्यात आला आहे. प्रशासनाने केलेल्या उपाय योजनामुळे आणि लासिकरणामुळे ही शक्य झाले आहे. सध्या जिल्ह्यात केळव ८२७ जनावरे ही या आजाराने बाधित आहेत.

पुणे : पशुधनातील लम्पी चर्मरोग नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने वेळीच पावले उचलत गतीने १०० टक्के लसीकरण पूर्ण केल्यामुळे जिल्ह्यात हा आजार नियंत्रणात येत आहे. पशुसंवर्धन विभागाने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना केल्यामुळे लंपी बाधित जनावरांची संख्या कमी झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

बीड येथील वंजारी समाजाचा अजब ठराव; मराठा समाजाच्या दुकानांतून खरेदी न करण्याचा निर्णय, वातावरण पेटले

Jalgaon House Collapsed: जळगावात वादळी वाऱ्यामुळे घर कोसळलं, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Pune Car Accident : आरोपीच्या रक्ताच्या नमुन्याचा रिपोर्ट डॉक्टरांनी कचऱ्यात फेकला; पुणे पोलीस आयुक्तांची माहिती

Eastern Freeway Accident: मुंबई ईस्टर्न फ्रीवेवर ४ वाहनांमध्ये धडक, वडाळा ते माझगावदरम्यान मोठी वाहतूक कोंडी

जिल्ह्यात पशुधनातील लम्पी चर्मरोगाची प्रकरणे आढळून येताच तातडीने ८ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी लंपी संसर्ग केंद्रापासून १० किलोमीटरचा परिसर बाधित व निगराणी क्षेत्र घोषित केले. त्यानंतर राज्य शासनाने संपूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून जाहीर केले. लंपीचा संसर्ग रोखण्यासाठी जनावरांची खरेदी विक्रीसाठी बाजार, प्राण्यांचे प्रदर्शन, जत्रा, प्राण्यांच्या शर्यती यावर निर्बंध आणले गेले. तात्काळ लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. लंपीबाबत उपाययोजनांसाठी तज्ज्ञांचे ५ चमू बनवून उपाययोजना हाती घेण्यात आल्या. पशुसंवर्धन विभागाने तातडीने लसीकरण हाती घेतले.

जिल्ह्यातील १३ तालुक्यातील १६३ गावातील जनावरे लंपी चर्मरोगाने बाधित झाले होते. त्यामध्ये ४ हजार २२३ जनावरांना हा आजार झाला होता. तातडीने लसीकरण हाती घेत ८ लाख २८ हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. वेळीच लसीकरण मोहिम हाती घेतल्याने वेगाचा प्रादुर्भाव नियंत्रित क्षेत्राबाहेर अधिक वाढला नाही. आज लंपीबाधित ८२७ सक्रीय (ॲक्टीव्ह) जनावरे आहेत. तथापि, लसीकरणानंतर पशुधनातील आजाराची गुंतागुंत होत नसून जनावरे बरी होत आहेत. जिल्ह्यात वेळेवर उपाययोजना केल्याने पशुधनाच्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे.

बाधित जनावरांपैकी ३ हजार १४५ जनावरे बरी झाली असून १८४ दगावली आहेत. सक्रीय (ॲक्टीव्ह) जनावरांपैकी त्यापैकी ६४ गंभीर आजारी आहेत. लम्पीमुळे मृत्यू झालेल्या १२८ जनावरांच्या मालकांना ३० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शिवाजी विधाटे यांनी दिली.

इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर, निमगाव, बारामती तालुक्यातील खांडज, लोणीभापकर व वडगाव निंबाळकर तसेच खेड तालुक्यातील किवळे गावे लंपी प्रादुर्भावाची हॉटस्पॉट ठरली होती. इंदापूर तालुक्यात सर्वाधिक १ हजार १७२ जनावरे बाधित झाली होती. त्याखालोखाल बारामती ६८३, खेड ६७४, जुन्नर ३६३, दौण्ड ३२४, हवेली २७८, शिरूर २७१, मावळ १५९, पुरंदर १२२, आंबेगाव १०१, मुळशी ६१, भोर १४ तर वेल्ह्यामध्ये एक जनावर लंपीने बाधित झाले होते, अशीही माहिती पशू संवर्धन अधिकारी शिवाजी विधाटे यांनी दिली.

]

 

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या