मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Udayanraje Bhosale: कोणी गुन्हा केल्यास त्याला थेट जाग्यावर गोळ्या घाला, उदयनराजेंचे खळबळजनक वक्तव्य

Udayanraje Bhosale: कोणी गुन्हा केल्यास त्याला थेट जाग्यावर गोळ्या घाला, उदयनराजेंचे खळबळजनक वक्तव्य

Apr 10, 2023, 11:49 PM IST

  • Udayanraje Bhosale :  एखादा गुन्हेगार गुन्हा करत असल्यास त्याला पोलिसांनी डायरेक्ट शूट ॲट साईट करावे, असे खळबळजनक विधान खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.

खासदार उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale : एखादा गुन्हेगार गुन्हा करतअसल्यास त्याला पोलिसांनी डायरेक्ट शूट ॲट साईट करावे, असे खळबळजनक विधान खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.

  • Udayanraje Bhosale :  एखादा गुन्हेगार गुन्हा करत असल्यास त्याला पोलिसांनी डायरेक्ट शूट ॲट साईट करावे, असे खळबळजनक विधान खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.

आपल्या बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एक खळबळजनक विधान केले आहे. समाजातील गुन्हेगारीच्या घटना रोखायच्या असतील तर, एखादा गुन्हेगार गुन्हा करत असल्यास त्याला पोलिसांनी डायरेक्ट शूट ॲट साईट करावे, असे विधान खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. पुणे- बंगळुरु महार्गावरील कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील उड्डाण पुलाच्या कामाचा आढावा उदयनराजे भोसले यांनी घेतला.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Aircraft : टग ट्रकच्या धडकेत विमानाला पडले भगदाड! पुणे विमानतळावर रोखले उड्डाण; पुणे- दिल्ली विमानाचा अपघात टळला

mahayuti mumbai rally : महायुतीच्या सभेसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठा बदल! जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद?

Pune : पुणेकरांनो मुंबईला जात असाल तर ही बातमी वाचा! सीएसएमटी प्लॅटफॉर्म विस्तारीकरणामुळे प्रगती, डेक्कन एक्सप्रेस रद्द

Mumbai college bans hijab: मुंबईतील आचार्य मराठे कॉलेजमध्ये हिजाब, बुरख्यावर बंदी कायम, ड्रेसकोडचा नियम 'जैसे थे' राहणार

उड्डाण पुलाचे काम करणाऱ्या डीपी जैन कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाल्यानंतर उदयनराजेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, आपल्या कायद्यात भरपूर पळवाटा आहेत. १६ ते १८ वयाच्या आतील गुन्हेगार मुलांच्या संख्येत वाढ झाली आहे. गुन्हा केल्यानंतर त्यांना बालसुधारगृहात ठेवले जाते. नंतर ते तेथून सुटतात. यावर माझं म्हणणं आहे की, एखाद्याला जर संपवायचं असेल तर पुढं मागं न बघता डायरेक्ट शूट ॲट साईट करून मोकळं व्हायचं. असे जोपर्यंत केले जात नाही तोपर्यंत समाजात गुन्हेगारी घटना होतच राहतील. त्या थांबणार नाही.

उदयन भोसले म्हणाले की, समाजातील वाढती गुन्हेगारी कशी थांबवणार?  महिलांवर होणारे अत्याचार कशा थांबवणार? कारण वकील मंडळी भरपूर आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर मी स्वतः एखादा गुन्हा केला, नंतर मी वकील देणार आणि सुटणार.

 

दुसरीकडे ज्यांच्यावर अत्याचार झाला आहे ते पोलिसात धाव घेतात. तेथे पोलीस त्यांच्यावरच गुन्हा नोंदवतात, असं खासदार उदयनराजे म्हणाले.

 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या