मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dharavi Project : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या निविदा अटी ‘मविआ’ सरकारच्या काळातच ठरल्या, अदानी समूहाकडून खुलासा

Dharavi Project : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या निविदा अटी ‘मविआ’ सरकारच्या काळातच ठरल्या, अदानी समूहाकडून खुलासा

Dec 16, 2023, 11:52 PM IST

  • Dharavi Redevelopment Project : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या निविदा अटी महाविकास आघाडी सरकारच्या काळातच अंतिम झाल्या होत्या, त्यामध्ये कसलाही बदल केला नसल्याचा खुलासा अदानी समुहाकडून करण्यात आला आहे.

adani group clarified on Dharavi Redevelopment Project

Dharavi Redevelopment Project : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या निविदा अटी महाविकास आघाडी सरकारच्या काळातच अंतिम झाल्या होत्या, त्यामध्ये कसलाही बदल केला नसल्याचा खुलासा अदानी समुहाकडून करण्यात आला आहे.

  • Dharavi Redevelopment Project : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या निविदा अटी महाविकास आघाडी सरकारच्या काळातच अंतिम झाल्या होत्या, त्यामध्ये कसलाही बदल केला नसल्याचा खुलासा अदानी समुहाकडून करण्यात आला आहे.

अदानी समुहाकडून होणाऱ्या धारावी पुनर्विकास प्रकल्पात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करत धारावीचा विकास अदानी समुहाकडून न करता राज्य सरकारने करावा या मागणीसाठी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने मोर्चा काढला होता.  मोर्चानंतर झालेल्या सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी अदानी समूहासह शिंदे सरकारवर दलाली केल्याचा आरोप केला. तसेच माझ्याकडे अडकित्ता व खलबत्ता आहे, दलाली चेचून काढू, असा हल्लाबोल ठाकरेंनी केला होता. उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर अदानी समूहाकडून प्रकल्पाबाबत खुलासा करण्यात आला आहे. धारावी प्रकल्पाच्या अटी महाविकास आघाडी सरकारच्या काळातच अंतिम झाल्याचा दावा अदाणी समूहाने केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

अदानी समूहाने एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करत म्हटलं आहे, कीधारावी पुनर्विकास प्रकल्प निष्पक्ष,खुल्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धात्मकलिलाव प्रक्रियेद्वारेपार पडला.अदानी समूहाने मोठी बोली लावून हा प्रकल्प मिळवला आहे.तसेच महाविकास आघाडी (MVA)सरकार सत्तेवर असताना निविदा अटींना अंतिम रूप देण्यात आले.

धारावी प्रकल्पाबाबत चुकीची माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. धारावी प्रकल्पाच्या अटी महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातील आहेत. निविदा प्रक्रियेनंतर अटींमध्ये समूहाने कुठलाही बदल केला नाही. त्यामुळे समूहाला कुठलाही लाभ झाल्याचा दावा करणं चुकीचं आहे. निविदेतील अटी आणि कायद्यानुसारच ‘टीडीआर’ चं पालन केलेले आहे. धारावीकरांच्या पुनर्वसनावर ‘टीडीआर’चा कुठलाही परिणाम होणार नाही.

सर्व सदनिकाधारकांना धारावीत घरे देण्यात येतील. तसेच,पात्र सदनिकाधारांना मुंबईतील ‘एसआरए’ पेक्षा १७ टक्के अधिक क्षेत्रफळ मिळेल,  निविदा अटींनुसार, अपात्र सदनिका धारकांनाही रेंटल हाऊसिंग धोरणांतर्गत निवास व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या