मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Devendra Fadnavis: 'राज्यपालांच्या वक्तव्याचा विपर्यास तर सुधांशू त्रिवेदी चुकीचं बोलले नाहीत'

Devendra Fadnavis: 'राज्यपालांच्या वक्तव्याचा विपर्यास तर सुधांशू त्रिवेदी चुकीचं बोलले नाहीत'

Nov 21, 2022, 09:35 AM IST

  • Devendra Fadnavis on Sudhanshu Trivedi: राज्यपालांच्या मनात काही शंका नाही, मात्र त्यांच्या विधानाचा विपर्यास करून विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस (Deepak Salvi)

Devendra Fadnavis on Sudhanshu Trivedi: राज्यपालांच्या मनात काही शंका नाही, मात्र त्यांच्या विधानाचा विपर्यास करून विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  • Devendra Fadnavis on Sudhanshu Trivedi: राज्यपालांच्या मनात काही शंका नाही, मात्र त्यांच्या विधानाचा विपर्यास करून विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis on Sudhanshu Trivedi: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याने राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपलांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचं म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं की," जोपर्यंत सूर्य आणि चंद्र असेल तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे राज्य आणि देशाचे आदर्श असतील." पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

फडणवीस म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचेच आदर्श आहेत. तेच आमचे हिरो आहेत. महाराजांसारखा दुसरा आदर्श नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य तसेच त्यांच्या शौर्याची माहिती देशातील सर्वांना आहे. राज्यपाल कोश्‍यारी यांनादेखील त्याची चांगली माहिती आहे. राज्यपालांच्या मनात काही शंका नाही, मात्र त्यांच्या विधानाचा विपर्यास करून विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे."

सुधांशू त्रिवेदी हे छत्रपती शिवाजी महाराजंबाबत चुकीचे बोलले नसल्याचं फडणवीसांनी सांगितलं. ते म्हणाले की, "सुधांशू त्रिवेदी यांनी केलेलं वक्तव्य मी नीट ऐकलं आहे. कुठल्याही वक्तव्यात त्यांनी महाराजांनी माफी मागितली असं म्हटलेलं नाही."

राज्यपालांनी आदर्श लोकांबद्दल बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी यांचा उल्लेख करताना छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातले आदर्श होते असं म्हटलं होतं. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी औरगंजेबाला पाच पत्रे लिहून माफी मागितली असं वक्तव्य सुधांशू त्रिवेदी यांनी केल्याचा आरोप केला जात आहे.

पुढील बातम्या