मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Budget Session : अमृताकडे वळतोय, भलताच अर्थ काढू नका; फडणवीसांच्या वक्तव्यानं सभागृहात हास्यकल्लोळ

Budget Session : अमृताकडे वळतोय, भलताच अर्थ काढू नका; फडणवीसांच्या वक्तव्यानं सभागृहात हास्यकल्लोळ

Mar 09, 2023, 04:07 PM IST

    • Maharashtra Budget Session : अर्थसंकल्प मांडत असतानाच अर्थमंत्री फडणवीसांनी त्यांच्या पत्नीच्या नावाचा उल्लेख केला, त्याचं स्पष्टीकरण दिल्यानंतर विरोधकांसह सत्ताधारी आमदारांमध्ये एकच हशा पिकला.
amruta fadnavis (HT)

Maharashtra Budget Session : अर्थसंकल्प मांडत असतानाच अर्थमंत्री फडणवीसांनी त्यांच्या पत्नीच्या नावाचा उल्लेख केला, त्याचं स्पष्टीकरण दिल्यानंतर विरोधकांसह सत्ताधारी आमदारांमध्ये एकच हशा पिकला.

    • Maharashtra Budget Session : अर्थसंकल्प मांडत असतानाच अर्थमंत्री फडणवीसांनी त्यांच्या पत्नीच्या नावाचा उल्लेख केला, त्याचं स्पष्टीकरण दिल्यानंतर विरोधकांसह सत्ताधारी आमदारांमध्ये एकच हशा पिकला.

Maharashtra Budget Session Live Updates : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला आहे. शेतकरी, कामगार, महिला आणि अनेक समाजघटकांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात मोठ-मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहे. देशाच्या अमृतकाळातील महाराष्ट्राचा अर्थसंकल्प पंचामृत ध्येयावर आधारीत असल्याचं अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी विधानसभेत थेट स्वत:च्या पत्नीचा म्हणजेच अमृता फडणवीस यांचा उल्लेख केला. त्यानंतर त्यांनी त्यावर स्पष्टीकरण देत फिरकी घेतली. त्यामुळं सभागृहातील सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाच्या आमदारांना हसू आवरेनासं झालं.

ट्रेंडिंग न्यूज

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

नेमकं काय घडलं?

सभागृहात अर्थसंकल्प सादर करत असताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अमृतकाळातील महाराष्ट्राचा हा अर्थसंकल्प पंचामृत ध्येयावर आधारीत आहे. मी शब्द फार जपून वापरतोय, कारण मी चुकून अमृता शब्दाकडे वळलो तर त्यातून भलताच अर्थ काढला जाईल, देवेंद्र फडणवीसांनी असं म्हणताच सभागृहात एकच हास्यकल्लोळ उडाला. त्यानंतर सभागृहातील तापलेलं वातावरण काहीसं निवळलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पातील पुढील तरतूदी वाचण्यास सुरुवात केली.

निकाल विरोधात जाणार असल्यामुळं मोठ्या घोषणा- अजित पवार

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभेत अर्थसंकल्प सादर होत असताना माझ्या डोळ्यासमोर १४ मार्चची तारीख येत होती. १४ मार्चला सुप्रीम कोर्टातील निकाल सरकारच्या विरोधात जाणार असल्याचं सत्ताधाऱ्यांना कळालं असावं, असं मला वाटतं. त्यामुळं त्यांनी फार मोठ्या घोषणा केल्या आहेत, असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जोरदार टोला हाणला आहे.

पुढील बातम्या