मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kirit Somaya Video: आठ तासाचा व्हिडिओ विधानपरिषद सभापतींकडे सुपूर्द; पोलीस चौकशीचे आदेश

Kirit Somaya Video: आठ तासाचा व्हिडिओ विधानपरिषद सभापतींकडे सुपूर्द; पोलीस चौकशीचे आदेश

Jul 18, 2023, 02:47 PM IST

  • Kirit Somaya Video- भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओचा मुद्दा आज विधिमंडळाच्या अधिवेशनात गाजला.

Kirit Somaiya (HT_PRINT)

Kirit Somaya Video- भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओचा मुद्दा आज विधिमंडळाच्या अधिवेशनात गाजला.

  • Kirit Somaya Video- भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओचा मुद्दा आज विधिमंडळाच्या अधिवेशनात गाजला.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओचा मुद्दा आज विधिमंडळाच्या अधिवेशनात गाजला. सोमय्या यांचा आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ असलेला पेनड्राइव्ह विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज विधानपरिषद सभागृहात उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे सादर केला. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल असं आश्वासन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिलं.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

आज विधानपरिषदेत अंबादास दानवे यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचं थेट नाव घेत त्यांच्याबद्दल सभागृहात अनेक खळबळजनक आरोप केले. ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणांची भीती दाखवून काही महिला अधिकाऱ्यांना धमकी देऊन त्यांची पिळवणूक व शोषण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी केला. महामंडळांवर विविध पदांचे प्रलोभन दाखवून महिलांचे शोषण होत असल्याचं दानवे म्हणाले.

सोमय्या यांना केंद्र सरकारकडून ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. या संरक्षणातच त्यांनी महिलांचे शोषण केले असल्याचा खळबळजनक आरोप दानवे यांनी केला. या व्हिडिओमध्ये सोमय्या यांनी मराठी महिलांविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली असल्याची माहिती दानवे यांनी सभागृहात दिली. मराठी महिलांविषयी अश्लील आणि आक्षेपार्ह शब्दात संभाषण करणारे किरीट सोमय्या हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रद्रोही आहेत, अशी टीका दानवे यांनी केली आहे.

अनिल परब यांचा सोमय्यांवर हल्लाबोल

किरीट सोमय्या यांनी अनेकने विरोधकांवर धादांत खोटे आरोप केले. सोमय्यांच्या आरोपांमुळं काही नेत्यांची कुटुंब उद्धव झाली, असा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केला. भारतीय जनता पार्टी स्वतःला पार्टी विथ डिफरन्स म्हणवते. अशा अवस्थेत या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी परब यांनी केली.

 

पुढील बातम्या