मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Parbhani Crime : परभणी हादरले ! राजीनामा दे म्हणत उपसरपंच महिलेसह कुटुंबाला मारहाण, मुलाचा मृत्यू

Parbhani Crime : परभणी हादरले ! राजीनामा दे म्हणत उपसरपंच महिलेसह कुटुंबाला मारहाण, मुलाचा मृत्यू

Aug 08, 2023, 08:42 AM IST

    • Parbhani Crime : परभणीच्या सेलुतील ब्राह्मणगाव इथे धक्कादायक घटना घडली आहे. सरपंचाने कुटुंबियासोबत उपसरपंच महिलेला राजीनामा दे म्हणत तिच्या कुटुंबीयांना जबर मारहाण केली. या मारहाणीत एका मुलाचा मृत्यू झाला.
Parbhani Crime

Parbhani Crime : परभणीच्या सेलुतील ब्राह्मणगाव इथे धक्कादायक घटना घडली आहे. सरपंचाने कुटुंबियासोबत उपसरपंच महिलेला राजीनामा दे म्हणत तिच्या कुटुंबीयांना जबर मारहाण केली. या मारहाणीत एका मुलाचा मृत्यू झाला.

    • Parbhani Crime : परभणीच्या सेलुतील ब्राह्मणगाव इथे धक्कादायक घटना घडली आहे. सरपंचाने कुटुंबियासोबत उपसरपंच महिलेला राजीनामा दे म्हणत तिच्या कुटुंबीयांना जबर मारहाण केली. या मारहाणीत एका मुलाचा मृत्यू झाला.

परभणी : परभणीच्या सेलुतील ब्राह्मणगाव इथे सरपंच कुटुंबाने उपसरपंच महिलेला राजीनामा दे म्हणत तिला आणि तिच्या कुटुंबीयांना जबर मारहाण केली. या घटनेत उपसरपंच महिलेच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सरपंचांसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्वांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण आहे.

ट्रेंडिंग न्यूज

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Crime News: पाच कोटींच्या फसवणूक प्रकरणी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या अध्यक्षा शैलजा दराडे यांना अटक

साधना डोईफोडे, केशव डोईफोडे, पूनम डोईफोडे,महादेव डोईफोडे, कौसाबाई डोईफोडे अशी आरोपींची नावे आहेत. तर उपसरपंच शशिकला कांबळे यांना त्यांच्या कुटुंबासह मारहाण करण्यात आली असून यात त्यांचा मुलगा निखिल कांबळे याचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी घडली.

Pune Crime: भाडेकरूंची माहिती न घेणे पडले महागात; पिंपरी-चिंचवडमध्ये १६६ घरमालकांवर गुन्हा

पोलिसांनी दीलेल्या माहितीनुसार परभणीच्या सेलू तालुक्यातील ब्राह्मणगाव इथल्या उपसरपंच शशिकला कांबळे यांच्या घरी आरोपी सरंपच साधना डोईफोडे, केशव डोईफोडे, पूनम डोईफोडे,महादेव डोईफोडे, कौसाबाई डोईफोडे हे सर्व जण आले. यावेळी त्यांनी शशिकला कांबळे यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दाबाव टाकला. मात्र, त्यांनी नकार दिल्याने त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, सरपंच साधना डोईफोडे यांच्या कुटुंबीयांनी कांबळे यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना लोखंडी रॉड आणि दांडक्याने मरण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत उपसरपंच शशिकला कांबळे यांचा मुलगा निखिल कांबळे हा गंभीर जखमी झाल्याने त्याला दवाखान्यात भरती करण्यात आले होते. मात्र, रविवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान, शशिकला कांबळे यांनी सेलू पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार सरपंच साधना डोईफोडे,केशव डोईफोडे, पूनम डोईफोडे, महादेव डोईफोडे, कौसाबाई डोईफोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण शांतता आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या