मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Devendra Fadnavis On SC Verdict : सुप्रीम कोर्टाच्या निकालावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Devendra Fadnavis On SC Verdict : सुप्रीम कोर्टाच्या निकालावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...

May 11, 2023, 01:45 PM IST

    • Devendra Fadnavis On Supreme Court Verdict : राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने अंतिम निकाल सुनावला आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.
Devendra Fadnavis On Supreme Court Verdict (REUTERS)

Devendra Fadnavis On Supreme Court Verdict : राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने अंतिम निकाल सुनावला आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.

    • Devendra Fadnavis On Supreme Court Verdict : राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने अंतिम निकाल सुनावला आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.

Devendra Fadnavis On Supreme Court Verdict : राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणांवर आज सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निकाल दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सुप्रीम कोर्टाने विधानसभेच्या अध्यक्षांकडे सोपवला आहे. तसेच नव्या विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाचा व्हीप आणि प्रतोद नेमल्याच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर यांची चांगलीच खरडपट्टी केली आहे. त्याचबरोबर माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत चाचणी बोलावणं हे बेकायदेशीर कृत्य होतं, राज्यपालांनी राजकीय भूमिका घ्यायला नको होती, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने भगतसिंह कोश्यारींवर जोरदार ताशेरे ओढले आहे. त्यानंतर आता कोर्टाच्या निकालावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयामुळं आम्ही पूर्ण समाधानी आहोत. जे लोक कालपर्यंत निर्णय आमच्या विरोधात येणार असल्याचं सांगत उड्या मारत होते, त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं गेलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर आता त्यांच्या चर्चा किती थोंतांड होत्या, हे सर्वांसमोर आल्याचं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. याशिवाय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो, तो सर्वांनीच करायला हवा, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर आम्ही पूर्वस्थिती निर्माण करण्याचे आदेश दिले असते, परंतु त्यांनी राजीनामा दिल्यामुळं कोर्ट राजकीय स्थिती पूर्वस्थितीत आणू शकत नाही, शिवसेनेतील बंडखोर आमदारांना पात्र अथवा अपात्र करण्याचे अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांनाच असल्याचं सरन्यायाधीशांनी स्पष्ट केलं आहे. याशिवाय अपात्रतेच्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी 'आम्ही खरी शिवसेना' असा बचाव केला जाऊ शकत नाही, कुठल्याही पक्षातील अंतर्गत गट थेट पक्षावर दावा करू शकत नाही, असं म्हणत शिंदे गटाला फटकारलं आहे.

पुढील बातम्या