मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Devendra Fadanvis: गुणरत्न सदावर्ते कोणाचा माणूस आहे? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Devendra Fadanvis: गुणरत्न सदावर्ते कोणाचा माणूस आहे? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Oct 29, 2023, 04:06 PM IST

    • Devendra Fadanvis on Gunratna Sadawarte : गुणरत्न सदावर्ते हे देवेंद्र फडणवीस यांचा माणूस असल्याची टीका नेहमीच होते. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी यावर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
Devendra Fadanvis on Gunratna Sadawarte

Devendra Fadanvis on Gunratna Sadawarte : गुणरत्न सदावर्ते हे देवेंद्र फडणवीस यांचा माणूस असल्याची टीका नेहमीच होते. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी यावर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

    • Devendra Fadanvis on Gunratna Sadawarte : गुणरत्न सदावर्ते हे देवेंद्र फडणवीस यांचा माणूस असल्याची टीका नेहमीच होते. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी यावर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

Devendra Fadanvis on Gunratna Sadawarte : राज्यात मराठा आरक्षण विरोधात बोलणारे गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात मराठा समाजात संतप्त भावना आहे. परवा त्यांच्या गाडीवर हल्ला देखील झाला होता. या नंतरही गुणरत्न सदावर्ते यांनी टीका करणे सुरूच ठेवले आहे. दरम्यान हे गुणरत्न सदावर्ते हे देवेंद्र फडणवीस यांचा माणूस असल्याची टीका सातत्याने होत असते. यावरून फडणवीसांना अनेकदा लक्ष देखील करण्यात आहे. या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची बाजू स्पष्ट केली आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत यावर भाष्य केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “माझा गुणरत्न सदावर्तेंशी काही संबंध नाही. ते काही बोलतात त्याचे समर्थन मी कधीच करत नाही. मी स्पष्टपणे सांगतो की, ते जे काही बोलतात त्याला माझं अजिबात समर्थन करत नाही. सदावर्ते कुणाचा माणस आहे हे मला माहिती नाही. त्यांचा कोण वापर करतंय की, ते स्वतः बोलत आहेत ते मला माहिती नाही.

फडणवी एमहणाले, “मी ब्राह्मण असल्याने मला लक्ष केले जात आहे. मराठा समाजाच्या नावाने ज्यांनी राजकारण केलं असे काही जण मला लक्ष्य करत आहे. जो पर्यंत मी मुख्यमंत्री होतो तो पर्यंत हे आरक्षण कोर्टात टिकले माझ्या नंतर हे आरक्षण कोर्टात टिकले नाही. याबाबत काय आणि कसं घडलं ते सगळ्यांना माहीत आहे. जेव्हा एखाद्याला श्रेय देता येत नाही तेव्हा त्याचं श्रेय काढून घेण्याचा प्रयत्न केला जातो. मनोज जरांगे पाटील यांनाही अशाच कुणीतरी हे सांगितलं असावं असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या