मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचा अकोला, धाराशीवचा दौरा अचानक रद्द, राजकीय चर्चांना उधाण

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचा अकोला, धाराशीवचा दौरा अचानक रद्द, राजकीय चर्चांना उधाण

Jun 14, 2023, 11:24 AM IST

    • Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियोजित दौरा रद्द करत विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या जाहिरातीमुळं फडणवीस नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis (Chandrakant Paddhane)

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियोजित दौरा रद्द करत विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या जाहिरातीमुळं फडणवीस नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

    • Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियोजित दौरा रद्द करत विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या जाहिरातीमुळं फडणवीस नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Devendra Fadnavis Vidarbha Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून मंगळवारी अनेक वृत्तपत्रांत देण्यात आलेल्या जाहिरातीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यातच आता देवेंद्र फडणवीस यांनी नियोजित अकोला आणि धाराशीव दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कानाला दुखापत झाल्याने फडणवीस घरीच तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत असल्याची माहिती आहे. परंतु आता त्यांच्या निर्णयामुळं सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटात काहीही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेने मंगळवारी दिलेल्या जाहिरातीत एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जास्त लोकप्रिय असल्याचा दावा करण्यात आला होता.

ट्रेंडिंग न्यूज

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

Worli Rape: नोकरीचे आमिष दाखवत तरुणीला जाळ्यात अडकवलं, भेटायला बोलवून बलात्कार; वरळीतील घटना

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी दुपारपासून विदर्भातील अकोला आणि मराठवाड्यातील धाराशीवच्या दौऱ्यावर जाणार होते. यावेळी ते भाजपाचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणार असल्याची माहिती होती. परंतु प्रकृतीच्या कारणामुळं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला आणि धाराशीवचा दौरा अचानक रद्द केला आहे. त्यांच्या कानाला दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. त्यांना झालेली दुखापत किरकोळ असून कार्यकर्त्यांनी त्यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर मोठी गर्दी केली आहे. तसेच मुंबई, ठाणे आणि नागपूर येथील भाजपा नेते आणि कार्यकर्ते देखील देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झाल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात जोरदार संघर्ष...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मंगळवारी वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीत मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जास्त पसंती एकनाथ शिंदे यांना असल्याचा दावा केला होता. त्यानंतर भाजपाच्या गोटात मोठी अस्वस्थता पसरली होती. त्यानंतर शिवसेनेकडून बुधवारी म्हणजेच आज दुसरी नवी जाहिरात देण्यात आली आहे. त्यात शिंदेंसह फडणवीस यांचाही फोटो आहे. त्यातील घोषणाही बदलण्यात आली असून शिवसेना-भाजपा युतीला सर्व्हेत सत्ता मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

पुढील बातम्या