मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dahi Handi 2023 : गोविंदा रे गोपाळा.. मुंबईत १०७ गोविंदा जखमी, आकडा वाढण्याची शक्यता

Dahi Handi 2023 : गोविंदा रे गोपाळा.. मुंबईत १०७ गोविंदा जखमी, आकडा वाढण्याची शक्यता

Sep 07, 2023, 03:56 PM IST

  • Dahi Handi 2023 Live Update : मुंबईत व महाराष्ट्रात ठिकठिकाणी गोविंदा रे गोपाळा.. गोविंदा आला रे.. च्या तालावर दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. राज्यात अनेक ठिकाणी रात्री १० वाजेपर्यंत डॉल्बीसाठी परवानगी दिल्याने दहीहंडीला लवकर सुरुवात झाली आहे.

Dahi Handi 2023 

Dahi Handi2023 Live Update : मुंबईत व महाराष्ट्रात ठिकठिकाणी गोविंदा रे गोपाळा.. गोविंदा आला रे.. च्या तालावर दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. राज्यात अनेक ठिकाणी रात्री १० वाजेपर्यंत डॉल्बीसाठी परवानगी दिल्याने दहीहंडीला लवकर सुरुवात झाली आहे.

  • Dahi Handi 2023 Live Update : मुंबईत व महाराष्ट्रात ठिकठिकाणी गोविंदा रे गोपाळा.. गोविंदा आला रे.. च्या तालावर दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. राज्यात अनेक ठिकाणी रात्री १० वाजेपर्यंत डॉल्बीसाठी परवानगी दिल्याने दहीहंडीला लवकर सुरुवात झाली आहे.

मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर व औरंगाबादसह संपूर्ण राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष व उत्साह दिसून येत आहे. मुंबईतही विविध ठिकाणी दहीहंड्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दहीहंडी उत्सवनिमित्ताने महानगरपालिकेची सर्व रुग्णालये अॅक्शन मोडवर आहेत. मुंबई शहर व उपनगरांत दहीहंडी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली जात आहे.  

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Water Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा; गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले भागांतील पाणीकपातीचा निर्णय रद्द

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Dahi Handi 2023 LIVE Update -

  • रात्री ९ वाजेपर्यंत १०७ गोविंदा जखमी झाल्याची माहिती मुंबई महापालिकेने  दिली. यापैकी १४ गोविंदाची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, ६२ जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.  ३१ गोविंदावर ओपीडीमध्ये उपचार सुरू आहेत.
  • दहीहंडीचे थर लावत असताना आतापर्यंत ७७ गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली. त्यातील ३१ जणांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
  • दहीहंडीचे थर लावत असताना आतापर्यंत ७७ गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व गोविंदांना मुंबईतील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 
  • आतापर्यंत जखमी झालेल्या ७७ गोविंदांपैकी १८ गोविंदांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ५२ जणांवर ओपीडीत उपचार सुरु आहेत.
  • घाटकोपरमध्ये  आमदार राम कदम यांची, दादरमध्ये शिवसेना भवनजवळ युवासेनेकडून निष्ठा दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. 
  •  आमदार प्रकाश सुर्वे मागाठणे येथे दहीहंडीचे आयोजन केले होते. या दहीहंडी उत्सवात विविध राजकीय नेत्यांसह मराठी, हिंदी चित्रपटातील कलाकारांनी हजेरी लावली होती.
  • कोल्हापुरात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी धनंजय महाडिक गटाची युवाशक्ती दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे. यात विजेत्यांना ३ लाखांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे.
  • मुंबईत आज भाजपच्या वतीने ४००  दहीहंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे. लालबागमध्ये भाजपने बदलाची दहीहंडी उभारली. तर वरळीत परिवर्तनाच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते.
  • राम कदमांची दहीहंडी फेमम ते दहीहंडीमुळे आमदार झाले - मुख्यमंत्री शिंदे
  • राज ठाकरे यांनी आज ठाण्यात अविनाश जाधव यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी सर्वांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या. काही वर्षांपूर्वी दहीहंडी उत्साहावर हायकोर्टातून बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता. पण आपण त्यासाठी लढलो होतो, अशी आठवण राज ठाकरे यांनी सांगितलं
  • थर रचताना ३५ जखमी झाले आहेत. यातील २२ गोविंदा ओपीडीमध्ये उपचार घेत आहेत. अन्य गोविंदांना उपचार करून सोडण्यात आले. गोविंदाना या सहासी खेळात कोणतीही दुखापत झाल्यास त्यावर तातडीने उपचार करण्याच्या सोई शासनामार्फत करण्यात आल्या आहेत. तसेच सर्व गोविंदांना विमा कवच देखील देण्यात आलं आहे.
  • जखमी गोविंदांवर तातडीने उपचार करण्यासाठी महापालिकेने शहरातील रुग्णालयामध्ये १२५ खाटा राखीव ठेवल्या आहेत. सायन रुग्णालयात १० खाटा, केईएममध्ये ७, नायर रुग्णालयात ४ आणि उर्वरित शहरांमध्ये तसेच मुंबईच्या उपनगरांमधील रुग्णालयात खाटा ठेवण्यात आल्यात.
  • जय जवान पथकाची ९ थरांची सलामी - ठाण्यातील वर्तक नगर परिसरात मोठी दहीहंडी बांधण्यात आली आहे. कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाने येथे ९ थरांची सलामी देण्याचा प्रयत्न केला. तर जय जवान पथकाने ९ थरांची यशस्वी सलामी दिली. एकावर एक थर रचत पथकाने ही सलामी दिली आहे. 
  • मुंबईत दहीहंडी फोडताना दोन गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. मनोरे रचताना अनेक बाळगोपाळांना दुखापत होते, त्यानुळे महापालिका सतर्क आहे. आतापर्यंत मुंबईत दोन गोविंदा जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. त्यातील एक गोविंदा केईएम रुग्णालयात आणि एक राजवाडी रुग्णालयात आहे. दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे.
  • लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलने मुंबईतील मागेठाणे येथील दहीहंडी उत्सवात सहभाग नोंदवला. तिने प्रकाश सुर्वे यांच्या मागाठाणे येथील दहीहंडी कार्यक्रमात हजेरी लावून ठेका धरला. मागाठाणे येथे तारामती चॅरिटेबल फाऊंडेशन दहीहंडीत गौतमी पाटीलने नृत्य केले.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या