मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dahi Handi 2023 : गोविंदांना राज्य सरकारकडून मोठं गिफ्ट.. विम्यासाठी १८ लाख ७५ हजारांचा निधी मंजूर

Dahi Handi 2023 : गोविंदांना राज्य सरकारकडून मोठं गिफ्ट.. विम्यासाठी १८ लाख ७५ हजारांचा निधी मंजूर

Aug 30, 2023, 04:22 PM IST

  • Dahi handi 2023 News : सरकारने दहीहंडी उत्सवातील गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. राज्य सरकारकडून  विम्यासाठी १८ लाख ७५ हजारांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

Dahi handi 

Dahihandi2023 News : सरकारनेदहीहंडी उत्सवातील गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.राज्य सरकारकडून विम्यासाठी १८ लाख ७५ हजारांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

  • Dahi handi 2023 News : सरकारने दहीहंडी उत्सवातील गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. राज्य सरकारकडून  विम्यासाठी १८ लाख ७५ हजारांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्याच वर्षी दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याची घोषणा केली होती. राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्ये खेळाडूंना दिलेल्या पाच टक्के आरक्षणाचा लाभ आता गोविंदांनाही मिळणार आहे. आता सरकारने दहीहंडी उत्सवातील गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. राज्य सरकारकडून विम्यासाठी १८ लाख ७५ हजारांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. ८ सप्टेंबर २०२३ पर्यंत हे विमा कवच योजना लागू राहणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Navi Mumbai: नववीत शाळा सोडली, युट्यूबवर पाहून नोटा छापायचं शिकला, 'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात!

maha ssc hsc board result 2024 : प्रतीक्षा संपली! पुढच्या आठवड्यात जाहीर होणार दहावीचा निकाल, बारावीचा कधी?

Pune Traffic change : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, मेट्रो कामामुळे 'या' प्रमुख मार्गावरील वाहतुकीत आजपासून मोठा बदल

Pune Aircraft : टग ट्रकच्या धडकेत विमानाला पडले भगदाड! पुणे विमानतळावर रोखले उड्डाण; पुणे- दिल्ली विमानाचा अपघात टळला

गेल्या वर्षी गोविंदा आणि गोविंदा पथकांसंदर्भात राज्य सरकारनं अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्यानंतर आज राज्य सरकारने गोविंदांसाठी हा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. दहीहंडी जवळ आली असून राज्यभरात दहीहंडीसाठी गोविंदा पथकांची जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. गोविंदा पथकांचा सरावही जोरात सुरू आहे. अशातच गोविंदांसाठी राज्य सरकारनं गोविंदाना सुरक्षेचं कवच प्रदान केलं आहे. राज्य सरकारने १८ लाख ७५ हजारांचे विमा कवच असणारी योजना जाहीर केली आहे. ही योजना ८ सप्टेंबर २०२३ पर्यंत लागू राहणार आहे. सरकारने यासंबंधीच्या सर्व प्रक्रियांना मंजूरी देत शासकीय आदेश जारी केले आहेत.

 

गेल्यावर्षी ५० हजार गोविंदांना राज्य सरकारकडून शासकीय विमा कवच देण्यात आलं होतं. पण आता ही संख्या वाढवून ७५ हजारांपर्यंत करण्यात आली आहे. राज्यभरातील ७५ हजार गोविंदांना शासकीय विमा कवच देण्याचे आदेश जारी केले आहेत. गेल्यावर्षीपेक्षा आणखी अतिरिक्त २५ हजार गोविंदांना राज्य सरकारनं विमा कवच दिलं आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या