मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Ganesh festivhal : 'दगडूशेठ'ने रचला इतिहास! विसर्जन मिरवणुकीत 'हे' पाहिल्यांदाच घडलं; वाचा सविस्तर

Pune Ganesh festivhal : 'दगडूशेठ'ने रचला इतिहास! विसर्जन मिरवणुकीत 'हे' पाहिल्यांदाच घडलं; वाचा सविस्तर

Sep 29, 2023, 07:31 AM IST

    • Pune dagadusheth ganpati visarjan : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे १३१ वे वर्ष असून श्री गणाधीश रथातून गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक काढण्यात आली होती रात्री ८.५० वाजता पांचाळेश्वर घाट येथे गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
Pune dagadusheth ganpati visarjan :

Pune dagadusheth ganpati visarjan : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे १३१ वे वर्ष असून श्री गणाधीश रथातून गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक काढण्यात आली होती रात्री ८.५० वाजता पांचाळेश्वर घाट येथे गणपतीचे विसर्जन करण्यात आले.

    • Pune dagadusheth ganpati visarjan : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे १३१ वे वर्ष असून श्री गणाधीश रथातून गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक काढण्यात आली होती रात्री ८.५० वाजता पांचाळेश्वर घाट येथे गणपतीचे विसर्जन करण्यात आले.

पुणे : जय गणेश... गणपती बाप्पा मोरया... पुण्याचा अधिपती दगडूशेठ गणपती... च्या जयघोषात गुरुवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुपारी ४ वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणुकीत सहभागी झाला. महिनाभरापूर्वी विसर्जन मिरवणुकीत दुपारी ४ वाजता सहभागी होण्याच्या केलेल्या घोषणेप्रमाणे दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या सांगता मिरवणुकीला दुपारी ४ वाजता थाटात प्रारंभ झाला. तर, पांचाळेश्वर मंदिर घाट येथे रात्री ८.५० वाजता विसर्जन झाले. विसर्जन मिरवणुकीच्या गेल्या काही वर्षांच्या परंपरेत पहिल्यांदाच अनंत चतुर्दशीच्या दिवासी दगडूशेठ गणपतीचे विसर्जन झाले.

ट्रेंडिंग न्यूज

Pune porsche Accident : दोघांना चिरडणाऱ्या बिल्डरच्या मुलाला जामीन; न्यायालयाने आरोपीला लिहायला लावला ३०० शब्दांचा निबंध

Panvel Rape: पॉर्न पाहून अल्पवयीन भावाचा मोठ्या बहिणीवर बलात्कार; गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उजेडात!

Mumbai Weather Update: मुंबई, ठाण्यात आज उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरकून घ्या मतदान

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

Manipur Violence : मणीपुर येथे आंदोलकांचा थेट मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या घरावर हल्ला; सुरक्षा रक्षकांचा गोळीबार

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३१ व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक लक्ष्मी रस्त्याने श्री गणाधीश रथातून काढण्यात आली. विसर्जन मिरवणुकीसाठीचा श्री गणाधीश रथ हा भगवान श्रीगणेश आणि यंदाची सजावट असलेल्या अयोध्या श्रीराम मंदिर संकल्पनेला सुसंगत असा साकारण्यात आला होता. तसेच आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघाला.

Maharashtra weather update: राज्यात पुढील ७२ तासांत मुसळधार पाऊस बरसणार! या जिल्ह्यांना दिला ऑरेंज अलर्ट

मिरवणुकीत आरोग्य रथ अग्रभागी सहभागी झाला होता. दरवर्षीप्रमाणे यंदा सामाजिक विषयांतर्गत आरोग्यविषयक जनजागृती रथावरुन करण्यात आली. याखेरीज मिरवणुकीत प्रभात ब्रास बँड, दरबार ब्रास बँड, स्वरूप वर्धिनीचे ढोल-लेझिम पथक, सनई-चौघडा असा लवाजमा होता.

तसेच पुरुष भाविकांसह महिला गणेशभक्त मोठया संख्येने सहभागी झाले होते. टिळक चौकामध्ये रात्री ८.२० च्या सुमारास दगडूशेठ गणपतीचे आगमन झाले. त्यानंतर पांचाळेश्वर मंदिर घाट येथे रात्री ८.५० वाजता विसर्जन झाले. पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने हे शक्य झाल्याची भावना ट्रस्टच्या विश्वस्तांनी व्यक्त केली.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या