मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Corona Update: महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ३७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Maharashtra Corona Update: महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ३७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Dec 26, 2023, 10:53 PM IST

    • Coronavirus: महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.
Coronavirus in Maharashtra

Coronavirus: महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

    • Coronavirus: महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

COVID19 News: महाराष्ट्रात दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून येत आहेत. राज्यात मंगळवारी कोविड- १९ चे ३७ नवे रुग्ण सापडले. यासह राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या १९४ वर पोहोचली. तर, ११ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात कोविडमधून बरे होण्याचे प्रमाण ९८.१८ टक्के आहे. महत्त्वाचे म्हणजे, कोविडचा नवा व्हेरिएंट जेएन १ संपर्कात आलेल्या कोणताही रुग्ण आढळला नाही.

ट्रेंडिंग न्यूज

Narendra Modi : जिरेटोप घातला आता मोदींना सिंहासनावरही बसवणार का? प्रफुल्ल पटेलांवर टीकेची झोड

Fact check : मुंबई भाजपच्या निवडणूक प्रचार साहित्यात सोन्याची बिस्किटं? काय आहे सत्य?

Nashik Accident : नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस व कारचा भीषण अपघात; तिघे जागीच ठार, एक बालक गंभीर जखमी

Pune : पुण्यातील घटना! घरावर काळी छाया असल्याचे सांगत गुंगीचे औषध पाजून मायलेकीचे काढले विवस्त्र फोटो; १५ लाख उकळले

राज्यात मंगळवारी ३ हजार ६७० नमुन्यांपैकी ५५७ आरटी- पीसीआर आणि ३ हजार ११३ आरएटी चाचण्या घेण्यात आल्या. एकूण संक्रमित रुग्णांपैकी बहुतेक ओमिक्रॉन प्रकाराने ग्रस्त आहेत. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात सर्वाधिक लोकांना ओमिक्रॉनची लागण झाली. या वर्षी आतापर्यंत एकूण १ हजार ९७२ जणांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले. यातील १९ जणांचा मृत्यू झाला.

महाराष्ट्रात आतापर्यंत कोविड जेएन १ व्हेरिएंट संक्रमित रुग्णांची संख्या १० वर पोहोचली. यापैकी ठाण्यात पाच, पुणे महापालिका क्षेत्रात दोन, पुणे ग्रामीण, अकोल महापालिका आणि सिंधुदुर्गात प्रत्येकी एक- एक रुग्ण आढळून आला. यातील एक रुग्ण अवघ्या ९ वर्षांचा आहे. तर बहुतेक रुग्ण ४० वयांपेक्षा जास्त आहे. यापैकी ८ जणांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत. पुण्यातील रुग्ण अमेरिकेतून परतल्याचे सांगितले जात आहे.

आतापर्यंत मुंबईत सर्वाधिक ८८, ठाणे- ३०, रायगड- १९ आणि पुण्यात २८ रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, ताज्या आकडेवारीनुसार, एकूण १५१ लोक होम आयसोलेशनमध्ये होते. तर, १७ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी ११ नॉन आयसीयूमध्ये तर सहा जणांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले.

राज्यात कोरोना विषाणूच्या जेएन १ या प्रकाराच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता कोविड टास्क फोर्सची पुनर्रचना करुन नवीन टास्क फोर्सची स्थापना करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली. डॉ. रमण गंगाखेडकर टास्क फोर्सचे अध्यक्ष असतील.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या