मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thane JN1 : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं वाढवलं टेन्शन! ठाण्यात एकाच दिवसात आढळले पाच रुग्ण

Thane JN1 : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं वाढवलं टेन्शन! ठाण्यात एकाच दिवसात आढळले पाच रुग्ण

Dec 25, 2023, 09:24 AM IST

  • Thane JN1 Covid : कोरोनाच्या नव्या JN 1 व्हेरिएंटने राज्याचे टेन्शन वाढवले आहे. हळू हळू रुग्णसंख्येत वाढ होतांना दिसत आहे. पुण्यानंतर ठाण्यात देखील पाच रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणांना दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Thane JN1 Covid (HT_PRINT)

Thane JN1 Covid : कोरोनाच्या नव्या JN 1 व्हेरिएंटने राज्याचे टेन्शन वाढवले आहे. हळू हळू रुग्णसंख्येत वाढ होतांना दिसत आहे. पुण्यानंतर ठाण्यात देखील पाच रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणांना दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

  • Thane JN1 Covid : कोरोनाच्या नव्या JN 1 व्हेरिएंटने राज्याचे टेन्शन वाढवले आहे. हळू हळू रुग्णसंख्येत वाढ होतांना दिसत आहे. पुण्यानंतर ठाण्यात देखील पाच रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणांना दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Thane JN1 Covid : राज्यात कोरोनाच्या नव्या JN 1 व्हेरिएंटने टेन्शन वाढवले आहे. या नव्या व्हेरिएन्टचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळू लागले आहेत. देशासह राज्यात रुग्णसंख्या वाढतांना दिसत आहे. रविवारी पुण्यात या नव्या विषाणूने बाधित दोन रुग्ण आढळले होते. त्यानंतर आता ठाण्यात देखील पाच रुग्ण आढळले असल्याने ठाणेकरांची चिंता वाढली आहे. या वाढत्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य यंत्रणा देखील अलर्ट मोडवर आल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Fact check : मुंबई भाजपच्या निवडणूक प्रचार साहित्यात सोन्याची बिस्किटं? काय आहे सत्य?

Nashik Accident : नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस व कारचा भीषण अपघात; तिघे जागीच ठार, एक बालक गंभीर जखमी

Pune : पुण्यातील घटना! घरावर काळी छाया असल्याचे सांगत गुंगीचे औषध पाजून मायलेकीचे काढले विवस्त्र फोटो; १५ लाख उकळले

Sanjay Raut : ८०० कोटींच्या भूखंड घोटाळ्यात एकनाथ शिंदे लाभार्थी; संजय राऊत यांचं थेट मोदींना पत्र

पुणेकरांची चिंता वाढली.. शहरात कोरोना सब व्हेरिएंट JN 1 संक्रमित २ रुग्ण आढळले

राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत असतांना आरोग्य यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, रविवारी ठाण्यात देखील कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटने शिरकाव केला आहे. कोरोनाचा नवा व्हेरीयंट जेएन.1 चे पाच रुग्ण या ठिकाणी आढळले आहेत. यातील एक महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. यामुळे कोरोना बंधित रुग्णांची संख्या २८ वर गेली आहे. या नव्या व्हेरियंटमुळे चिंता वाढली आहे. आरोग्य यंत्रणांना आणखी सतर्क राहण्याच्या सूचना राज्य आरोग्य विभागाने दिल्या आहे. पाच पैकी दोन जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Pune koyta gang : पंगतीतून दुचाकीने फिरण्यास मनाई केल्याने नवरदेवावर कोयत्याने वार; पुण्यात कोयता गँग दहशत सुरूच

जेएन.1 चा राज्यातील पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला होता. राज्यात या नव्या विषाणूने बाधित नव्या ९ रुग्णांची रविवारी नोंद झाली. ठाणे महापालिका हद्दीत पाच, पुणे महापालिका हद्दीत दोन, पुणे जिल्हा आणि अकोला महापालिका हद्दीत प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.

कोरोनाच्या या नव्या विषाणूशी लढण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. नव्या विषाणूने बाधित ८ रुग्णांनी कोविडच्या लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर या रुग्णांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. सगळ्यांमध्ये जेएन १ व्हेरियंटचेची तीव्र लक्षणं आहेत.

खबरदारी म्हणून मास्क वापरा

देशात कोरोनाचा नवा विषाणू धुमाकूळ घालत आहे. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र गोवा या राज्यांमध्ये रुग्ण संख्या वधू लागली आहे. सुट्टी साठी नागरीक गर्दीच्या ठिकाणी जात असून र्यटनसाठी बाहेर पडतांना आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले असून गर्दीत जाणे टाळावे, मास्कचा वापर करावा असे आवाहन राज्य आरोग्य विभागाने केले आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या