मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Abdul Sattar : शिंदे गटातील खदखद चव्हाट्यावर; अब्दुल सत्तार यांच्या आरोपांमुळं खळबळ

Abdul Sattar : शिंदे गटातील खदखद चव्हाट्यावर; अब्दुल सत्तार यांच्या आरोपांमुळं खळबळ

Dec 31, 2022, 05:04 PM IST

  • Abdul Sattar: अब्दुल सत्तार यांच्यावर अनेक गंभीर आरोप विरोधकांनी केले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे. त्यांच्यावर होणाऱ्या आरोपाबाबत मोठा गौप्य स्फोट अब्दुल सत्तारांनी केला आहे.

Abdul Sattar (HT)

Abdul Sattar: अब्दुल सत्तार यांच्यावर अनेक गंभीर आरोप विरोधकांनी केले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे. त्यांच्यावर होणाऱ्या आरोपाबाबत मोठा गौप्य स्फोट अब्दुल सत्तारांनी केला आहे.

  • Abdul Sattar: अब्दुल सत्तार यांच्यावर अनेक गंभीर आरोप विरोधकांनी केले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे. त्यांच्यावर होणाऱ्या आरोपाबाबत मोठा गौप्य स्फोट अब्दुल सत्तारांनी केला आहे.

पुणे : गायरान जमीन घोटाळा, टीईटी प्रकरण कृषी महोत्सव यावरुन हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना घेरले आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी करून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्यावर होणाऱ्या या आरोपांमुळे त्यांनी आपल्याच गटातील नेत्यांवर गंभीर आरोप केल्याने शिंदे गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. सत्तार यांनी एका वृत वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गंभीर आरोप केले आहे. सत्तार म्हणाले, माझ्याच पक्षातील नेते माझ्याविरोधात कट रचत आहे. मुख्यमंत्र्यांच्या घरी झालेल्या चर्चा बाहेर येतात तरी कशा असा आरोप देखील त्यांनी केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Parbhani News : परभणी हादरली.. तु माझ्या पत्नीसारखीच म्हणत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

अब्दुल सत्तार सध्या विरोधकांच्या टार्गेट वर आहेत. त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत त्यांना विचारले असता सत्तार यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला. मुख्यमंत्र्यांच्या घऱात झालेल्या चर्चेतील गोष्टी बाहेर येत असल्याने सत्तार यांनी जाहीर नाराजी जाहीर व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांनी या प्रकरणी तक्रार केली आहे. तसेच याची चौकशी देखील करण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली आहे. पक्षातील नेतेच माझ्या विरोधात कट रचत असल्याचा आरोप त्यांनी केला.

सत्तार म्हणाले, “मी एक छोटा कार्यकर्ता आहे, मात्र यांनी संपूर्ण महाराष्ट्राला गिळले आहे. यांच्या चौकशा झाल्या तर भुई पळता थोडी होईल> मुख्यमंत्र्यांकडे सर्वांचा डेटा जमा आहे. मुख्यमंत्री सभागृहात बोलले आहेत. मी तर आधीच टीईटीमध्ये एका कागदाचाही फायदा घेतला असेल तर फासावर लटकवा म्हटले आहे. जोपर्यंत देव माझ्यासह आहे, तोपर्यंत मला काही होणार नाही. आमच्या पक्षातील असतील, काही हितचिंतक असतील किंवा विरोधी पक्षात ज्यांच्या खूर्च्या रिकाम्या झाल्या तेही असू शकतात माझ्या विरोधात सुरू असलेल्या कटात सहभागी असू शकतात असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरात चर्चा करत होतो. ती चर्चा बाहेर आली, तेव्हा मी त्यांना चुकीच्या बातम्या बाहेर येत असल्याचे सांगितले. मी कोणाचेही नाव घेतले नाही. त्याचा तपास मुख्यमंत्री करणार आहेत. त्यांच्याकडे मी तक्रार केली आहे, असेही सत्तार म्हणाले. विरोधी पक्षात माझे फार हितचिंतक आहेत. माझ्यासारख्या अल्पसंख्यांक समाजाच्या माणसाला महत्वाचे खाते दिल्याने अनेकांच्या मनात खदखद आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या