मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  “उद्या तिथं थुंकायलाही..”, विधानसभेतील ‘तो’ व्हिडिओ शेअर करत काँग्रेसचा अब्दुल सत्तारांना टोला

“उद्या तिथं थुंकायलाही..”, विधानसभेतील ‘तो’ व्हिडिओ शेअर करत काँग्रेसचा अब्दुल सत्तारांना टोला

Jul 25, 2023, 06:58 PM IST

  • Monsoon Session Maharashtra : पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण होत असल्याने सभागृहातील प्रत्येक हालचाल कॅमेऱ्यात टिपली जात आहे. याच कॅमेऱ्यात कैद झालेले एक दृश्य महाराष्ट्र काँग्रेसने त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केले आहे.

Monsoon Session Maharashtra

Monsoon Session Maharashtra : पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण होत असल्याने सभागृहातील प्रत्येक हालचाल कॅमेऱ्यात टिपली जात आहे. याच कॅमेऱ्यात कैद झालेले एक दृश्य महाराष्ट्र काँग्रेसने त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केले आहे.

  • Monsoon Session Maharashtra : पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण होत असल्याने सभागृहातील प्रत्येक हालचाल कॅमेऱ्यात टिपली जात आहे. याच कॅमेऱ्यात कैद झालेले एक दृश्य महाराष्ट्र काँग्रेसने त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केले आहे.

राज्यात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून अधिवेशनाचा सध्या दुसरा आठवडा सुरू आहे. विधानसभा आणि विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले असून आज रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवर विधानसभेत जोरदार चर्चा झाली. दोन्ही सभागृहांचे कामकाजाचे थेट प्रक्षेपण होत असल्याने सभागृहातील प्रत्येक हालचाल कॅमेऱ्यात टिपली जात आहे. याच कॅमेऱ्यात कैद झालेले एक दृश्य महाराष्ट्र काँग्रेसने त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

Pune porsche Accident : दोघांना चिरडणाऱ्या बिल्डरच्या मुलाला जामीन; न्यायालयाने आरोपीला लिहायला लावला ३०० शब्दांचा निबंध

काँग्रेसने ट्विट केलेला व्हिडिओ सोमवारी झालेल्या कामकाजाचा आहे. विधान परिषदेत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई निवेदन करत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब भेत घेतल्यानंतर मोदींनी शिंदेंबाबत कौतुक करत ट्वीट केले होते. या ट्वीटची शंभूराज देसाई सभागृहाला माहिती देत होते. शंभूराज देसाई यांच्या मागेच अल्पसंख्याक विकास विभागाचे मंत्री अब्दुल सत्तार बसले आहेत. अब्दुल सत्तार एक पुडी बाहेर काढतात आणि तोंडात टाकतात, असं काँग्रसने ट्वीट केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना महाराष्ट्र काँग्रेसकडून टीका करण्यात आली आहे. “विधानसभेत चर्चा सुरू असताना सत्तार महोदयांनी थेट पुडी काढून तोंडात टाकली आणि निर्धास्तपणे चघळत बसले. आज विधानसभेत पुडी खाऊन चघळतायत, उद्या तिथे थुंकायलाही कमी करणार नाहीत. शिंदे-फडणवीस सरकारच्या आमदारांना विधानसभा पानाची टपरी वाटते का?”, असं ट्वीट काँग्रेसने केलं आहे.

पुढील बातम्या