मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  'तो' निर्णय बाळासाहेबांच्या विरोधातील नाही का?; काँग्रेसचा एकनाथ शिंदेंना सवाल

'तो' निर्णय बाळासाहेबांच्या विरोधातील नाही का?; काँग्रेसचा एकनाथ शिंदेंना सवाल

Jul 15, 2022, 04:11 PM IST

    • Emergency Pension Scheme: आणीबाणीच्या विरोधात लढणाऱ्यांना पेन्शन देण्याचा निर्णय बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधात नाही का, असा सवाल काँग्रेसनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे.
Balasaheb Thackeray-Devendra Fadnavis-Eknath Shinde

Emergency Pension Scheme: आणीबाणीच्या विरोधात लढणाऱ्यांना पेन्शन देण्याचा निर्णय बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधात नाही का, असा सवाल काँग्रेसनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे.

    • Emergency Pension Scheme: आणीबाणीच्या विरोधात लढणाऱ्यांना पेन्शन देण्याचा निर्णय बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधात नाही का, असा सवाल काँग्रेसनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे.

Congress questions Eknath Shinde over Emergency Pension Scheme: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड करून भाजपसोबत सत्ता स्थापन करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी निर्णयाचा धडाका लावला आहे. आणीबाणीमध्ये कारागृहात गेलेल्या व्यक्तींना पेन्शन देण्याचा निर्णय शिंदे सरकारनं घेतला आहे. या निर्णयावरून काँग्रेसनं एकनाथ शिंदे यांच्या हेतूवरच शंका व्यक्त केली आहे. हा निर्णय बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधात नाही का, असा सवाल काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी एकनाथ शिंदे यांना केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची भूमिका घेऊन आम्ही वाटचाल करत आहोत. त्यांच्याच विचारानं आम्ही सरकार चालवत आहोत. काँग्रेस-राष्ट्रवादीशी फारकत घेण्याची आमची भूमिका बाळासाहेबांच्या विचाराशी सुसंगत आहे, असा दावा एकनाथ शिंदे व त्यांच्या सोबत गेलेले बंडखोर आमदार सातत्यानं करत आहेत. मात्र, औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला स्थगिती देण्याचा निर्णय शिंदे सरकारनं घेतल्यानं संभ्रम निर्माण झाल आहे. त्यातच आणाबाणीविरोधात लढणाऱ्या पेन्शनच्या निर्णयावरून आता सचिन सावंत यांनी शिंदे यांना घेरलं आहे.

‘बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार स्थापन केलं असे सांगणारे मुख्यमंत्री बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधात निर्णय होताना मूक साक्षीदार होतात हे दुर्दैव आहे. बाळासाहेबांचा आणीबाणीला पाठिंबा होता, मग आणीबाणीत कारागृहात गेलेल्यांना पेन्शनचा निर्णय बाळासाहेबांच्या विरोधातील नव्हे का?,’ असा सवाल सावंत यांनी ट्वीटच्या माध्यमातून मुख्यमंत्री शिंदे यांना केला आहे.

'स्वातंत्र्यलढ्यात कोणतंही योगदान नसणारे देशभक्तीचा बाजार मांडून सहानुभूती मिळवण्याचा सतत फुटकळ प्रयत्न करत आहेत. हा निर्णय म्हणजे स्वातंत्र्य चळवळीला कमी लेखून संघाचं महत्त्व वाढवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. खरंतर बाळासाहेब देवरस यांनी आणीबाणीला पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळं संघाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना पेन्शन घेण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यातही समाजवादी व इतर विचारांच्या आणीबाणीचा विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पेन्शन घेण्यास नकार दिला होता. त्यामुळं ही योजना केवळ संघाच्या स्वयंसेवकांसाठीच आहे, शिवसेनेसाठी नाही, याकडंही सचिन सावंत यांनी लक्ष वेधलं आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या