मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Balasaheb Thorat : एकनाथ शिंदेंना इतिहास घडवण्याची संधी; बाळासाहेब थोरात असं का म्हणाले?

Balasaheb Thorat : एकनाथ शिंदेंना इतिहास घडवण्याची संधी; बाळासाहेब थोरात असं का म्हणाले?

May 11, 2023, 02:22 PM IST

  • Balasaheb Thorat on SC Verdict : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर दिलेल्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.

Eknath Shinde - Balasaheb Thorat

Balasaheb Thorat on SC Verdict : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर दिलेल्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.

  • Balasaheb Thorat on SC Verdict : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर दिलेल्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.

Balasaheb Thorat demands Eknath Shinde Resignation : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचे वेगवेगळे अर्थ सत्ताधारी व विरोधक लावत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना घेरलं आहे. त्यांचं सरकार बेकायदेशीर असून सत्तेवर राहण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही, असं म्हटलं आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Konkankanya express : कोकणात जाणाऱ्या गाड्यांमध्ये तुफान गर्दी; ‘कोकणकन्ये’तून पडून तरुणाचा मृत्यू

Mumbai Goa Highway Traffic Jam: सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-गोवा मार्गावर ट्रॅफिक जाम; वाहनांच्या अनेक किमी लांबच लांब रांगा

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळची घट मांडणी; पावसापासून शेतीपर्यंत केले महत्वाचे भाकीत; वाचा

Mumbai Crime : नाश्ता बनवला नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात मारला हातोडा; कुर्ला येथील धक्कादायक घटना

'सर्वोच्च न्यायालयानं राज्यातील सत्तांतराच्या बाबतीत जो निर्णय दिलाय, तो विचार करायला लावणारा आहे. संपूर्ण देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणारा हा निर्णय आहे. सरकार पाडण्यासाठी केले गेलेले प्रयत्न पूर्णपणे बेकायदेशीर होते हे स्पष्ट करणारा हा निर्णय आहे, असं थोरात यांनी म्हटलं आहे.

'व्हीप नेमणं, आमदार फोडणं, राज्यपालांनी दिलेले निर्णय, विधानसभा अध्यक्षांनी दिलेले निर्णय बेकायदेशीर होते, असं न्यायालयानं म्हटलंय. याचा अर्थ जे काही झालं, ते सत्तेच्या लालसेनं बेकायदेशीरपणे करण्यात आलं होतं. आता एकनाथ शिंदे यांचं सरकार वाचलं असलं तरी मुख्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही, असं थोरात म्हणाले.

'उद्धव ठाकरे हे विश्वास ठरावाला सामोरे गेले असते तर त्यांना आम्ही पुन्हा मुख्यमंत्रिपदी नियुक्त करण्याचा आदेश दिला असता. मात्र, त्यांनी तसं न करता राजीनामा दिला त्यामुळं आता आम्हाला तो निर्णय देता येणार नाही. याचाच अर्थ आताचं सरकार हे पूर्णपणे अनैतिक आहे. त्यामुळंच एकनाथ शिंदे यांना एक चांगला पायंडा पाडण्याची, इतिहास घडवण्याची संधी चालून आली आहे. शिंदे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला पाहिजे. तसं जाहीर केलं पाहिजे. अन्यथा त्यांची सत्तालालसा पुन्हा दिसून येईल, असं थोरात यांनी म्हटलं आहे.

पुढील बातम्या